गडचिरोली: एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून पोस्टरबाजी

Naxal poster
Naxal poster
Updated on

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील गट्टा-जांबिया, तुमरगुंडा, कसनसुर, मंगेर अशा दुर्गम भागात व तहसिल कार्यालयापासून काही अंतरावर नक्षलवाद्यांनी पोस्टर लावून 26 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान शहिद सप्ताह साजरा करण्याचे जनतेला आव्हान केले आहे.

शोषित समाजाच्या हितासाठी शासनाशी लढताना शहीद झालेल्या नक्षल चळवळीतील अमर योद्धयांच्या स्मृती जागृत ठेवत फासीवादी शासनाविरुद्ध युद्ध पुकारण्यास सज्ज रहा असाही उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान माओवादी संघटनेकडून शहिद सप्ताह साजरा केला जातो. यावेळी माओवादी चळवळ स्थापनेपासून विविध घटनेत मारल्या घेलेल्या नक्षल्यांच्या स्मृतीपित्यर्थ दुर्गम भागातील जंगल परिसरात स्मारके उभारुन श्रद्धांजली कार्यक्रम घेतला जातो.

तसेच दुर्गम भागातील वाहतूक प्रभावित होत असुन नक्षली टार्गेटवर असणारे पुढारी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, पोलिस किंवा सामान्य नागरिक यांना लक्ष्य करून जीवे मारण्याचा प्रयत्न नक्षल्यांकडून केला जातो. मात्र पोलिस यंत्रणा सतर्क राहत असल्याने गेल्या अनेक वर्षात या काळात कोणतीही घटना घडलेली नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.