पॉलिटेक्निकच्या नोंदणीला का मिळतोय अल्प प्रतिसाद ....वाचा सविस्तर

Why Polytechnic registration is getting little response
Why Polytechnic registration is getting little response
Updated on


नागपूर  : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने १० ऑगस्टपासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, गेल्या सहा दिवसांत राज्यात केवळ ५ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात पॉलिटेक्निकच्या १ लाख १७८२४ जागा आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विभागाने पॉलिटेक्निक अभ्याक्रमाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून लॅपटॉप आणि मोबाईलवर अर्ज भरता येणे शक्य होणार आहे. यानुसार विद्यार्थ्यांना कागदपत्रे डाऊनलोड करावी लागणार आहेत.

विभागाकडून विद्यार्थ्यांचे ई-स्क्रुटनीच्या माध्यमातून अर्ज आणि कागदपत्रांची ऑनलाइन तपासणी करण्यात येईल. ज्यांच्याकडे मोबाईल वा लॅपटॉप नाही, त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने विशिष्ट वेळेत बोलावून त्यांचा कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. यासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून शुल्क भरता येईल. यासाठी १० ऑगस्टपासून अर्ज नोंदणीस सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना २५ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येणार आहे. मात्र, गेल्या सहा दिवसांत केवळ ५ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज नोंदविले आहे. गेल्या वर्षी राज्यात पॉलिटेक्निकच्या निम्म्या जागा रिक्त राहील्या होत्या. विभागात ५० महाविद्यालयांत १३ हजार १२६ जागांचा समावेश असून गेल्या वर्षी ६ हजार ४९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने निम्म्या जागा रिक्त राहिल्या होत्या.
 
मंगळवारपासून नोंदणी वाढण्याची शक्यता
दहावीचा निकाल २९ जुलैला लागला. मात्र, अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालेले नाही. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या दोन्ही प्रमाणपत्रांची गरज पडत असल्याने अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नसल्याचे दिसून येते. सोमवारपासून (१७) विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
१० ते २५ ऑगस्ट - अर्ज नोंदणी
१५ ते २५ ऑगस्ट कागदपत्रांची पडताळणी
२८ ऑगस्ट - तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे
२९ ते ३१ ऑगस्ट - आक्षेप घेता येणे
२ सप्टेंबर - अंतिम गुणवत्ता यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.