जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य संगोपन करून त्यांची वंशवृद्धी केली, अर्थप्राप्तीसाठी थोडा संयम ठेवला तर नफा देणारा दुग्धव्यवसायासारखा दुसरा कोणता व्यवसाय नसेल. हे अनुभवाचे बोल व्यक्त केले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील रुई येथील अल्पभूधारक सदाशिव झपाटे यांनी. सुमारे ४१ जनावरांचा हा व्यवसाय अत्यंत कष्टातून व विविध वैशिष्ट्य़ांनी त्यांनी नावारूपाला आणला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोल्हापूर जिल्ह्यात रुई (ता. हातकणंगले) येथील सदाशिव दत्तात्रय झपाटे यांची फक्त सव्वा एकर शेती आहे. पदवी शिक्षणानंतर किराणा दुकान व पीठगिरणी त्यांनी सुरू कली. पण स्पर्धा वाढू लागल्याने त्यातील नफा कमी झाला. मग पर्याय शोधण्यास प्रारंभ केला. शेतात ऊस होता. पण क्षेत्र कमी, त्यामुळे उत्पन्नावर मर्यादा आलेल्या. अखेर विचारांती दुग्धव्यवसाय करून पाहायचे ठरवले. सन २०१६ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राचा डेअरी व पोल्ट्रीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
दहा म्हशींपासून सुरुवात
हरयाणा व हिस्सार राज्यातून दहा म्हशी आणून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. कोणताच अनुभव नसल्याने घरच्या सदस्यांच्या परिश्रमातून व्यवस्थापन सुरू केले. सुरुवातीला थोडे स्वतःजवळचे व थोडे कर्ज करून तीस लाख रुपये भांडवल गुंतविले. आई बाळाबाई तसेच जयंत व विवेक ही दोन्ही मुले शिक्षण सांभाळत सदाशिव यांना मदत करू लागली.
आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात
अर्थकारण
दूध
शेणखत
जनावरांचे व्यवस्थापन
दूध उत्पादन- लीटरमध्ये
चाऱ्यासाठी राखीव क्षेत्र
दुग्धव्यवसाय सुरू केल्यानंतर झपाटे यांनी ऊस घेणे थांबविले. शेतात संपूर्णपणे वर्षभर चारा पिके घेण्यास सुरुवात केली. शिवाय दररोज एका नर्सरीतून दररोज पाचशे किलो उसाच्या कांड्या चाऱ्यासाठी घेण्यात येतात. एक रुपये प्रति किलो असा त्याचा दर आहे.
कुशल आर्थिक नियोजन
व्यवसायाची उभारणी करताना १३ लाख रुपयांचे स्वभांडवल वापरले. दूधसंस्थेमार्फत १७ लाखांचे कर्ज काढले. केवळ संस्थेला दूध पुरवठा केला तर कर्ज फेडण्यासाठी खूप अवधी गेला असता. हा व्यवसायही फायदेशीर झाला नसता. ही बाब लक्षात घेऊन शेजारील गावातील गवळ्यांशी संपर्क साधला.विक्रीदर ठरवून घेतला. दूध संस्थेपेक्षा प्रति लीटरला तो दहा ते बारा रुपयांनी जास्त होता. जादा रक्कम मिळावी यासाठी गवळ्याला दररोज ४० लीटर पुरवठा सुरू केला. संस्थेपेक्षा यातून दररोज चारशे रुपयांपर्यंत जादा रक्कम मिळू लागली. दुसरीकडे संस्थेकडे महिन्याला ३३ हजार रुपयांपर्यंतचा हप्ता सुरू होता. त्याची जुळणी व्हावी यासाठी संस्थेला म्हशीचे उर्वरित व गायींचे असे ७५ लीटरपर्यंत दूध पुरवण्यात येऊ लागले. यातून नफा व कर्जफेडीचा मेळ साधला. चार वर्षात सुमारे सात लाख रुपयांची कर्जफेड केली आहे.
घेतलेल्या जनावरांपासून तुम्ही वंशवृद्धी करीत राहिले पाहिजे. हा असा व्यवसाय आहे की एका जनावराची दोन, त्यातून चार अशी वृद्धी होत जाते. कमी भांडवलात नफा वाढत जातो. सुरुवातीची वर्षे मात्र नफ्याची अपेक्षा न करता संयम बाळगायला शिकले पाहिजे.आमच्या गोठ्यातच नऊ म्हशींची पैदास केली. कष्ट वेचण्याची तयारी हवी. यश मिळतेच.
- सदाशिव झपाटे, ९९६०१३३२३३
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.