पुणे - देशासह राज्यात यंदा हळद उत्पादनात १५ ते २५ टक्के उत्पादनात घटीचा अंदाज आहे. सध्या केवळ सांगलीत नवीन हळदीची आवक असून, कमाल ९००० रुपये दर मिळाला. तर वसमत बाजारात जुन्या हळदीला ५६५० ते ९१०० रुपये दर मिळाला. राज्यात हळदीला ५५०० ते ९१०० रुपयांदरम्यान हळदीला दर मिळत आहेत. आवकेचा हंगाम भरात आल्यानंतर दर काही काळासाठी किंचित दबावात येतील, यंदा हळदीच्या बाजारात तेजी राहील, शेतकऱ्यांनी दराचा अंदाज घेऊनच विक्री करावी, असे आवाहन जाणकरांनी केले आहे..
हेही वाचा : लिंबांसाठी शोधली पर्यायी बाजारपेठ
बाजार समित्यांतील दर (रुपये/क्विंटल)
सांगली
जुनी हळद - ५५०० ते ७०००
नवीन हळद - ५५०० ते ९०००
नांदेड
जुनी हळद - ५८०० ते ७५५०
हिंगोली
जुनी हळद - ६५५० ते ७२०३
वसमत
जुनी हळद - ५६५० ते ९१००
राज्यात हळद लागवडीनंतर पाचव्या महिन्यापासून हळद पिकाच्या वाढीची प्रक्रिया सुरू होते. सातव्या महिन्यापासून कंद वाढ, त्याची जाडी, गोलाई वाढण्यास प्रारंभ होतो. परंतु गतवर्षी राज्यात ऑक्टोबरअखेर पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी हळद पिकात पाणी साचले होते. तसेच उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे कंदकूज, कंद माशी, करपा रोगाच्या प्रादुर्भाव झाला होता. परिणामी, राज्यातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याची शक्यता हळद संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या हळदीचा हंगाम उशिरा सुरू झाला असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे हळदीच्या दरात वाढ झाली आहे. देशातून हळदीची निर्यात वाढेल, त्याचा फायदा दर वाढीस मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे दरवर्षी ८० ते ८५ लाख पोत्यांची होणारी विक्री पाच लाख पोत्यांनी वाढून ८५ ते ९० लाख पोत्यांपर्यंत वाढेल.
- मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.