प्रगतशील शेतकऱ्यांना ‘औषधी किसान सन्मान’ पुरस्कार प्रदान

सहसुविधा केंद्रात औषधी वनस्पतींचे संग्रहालयाचे उद्‌घाटन करण्यात आले
Pune University
Pune UniversitySakal
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या आयुष मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय सहसुविधा केंद्राच्या वतीने औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या निवडक प्रगतशील शेतकऱ्यांना ‘औषधी किसान सन्मान’ पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Pune University
‘वैद्यकीय महाविद्यालय काढणे म्हणजे छोटेस शहरच वसवण्यासारखे’

राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय यांची सात केंद्र असून त्यातील विद्यापीठात असणाऱ्या केंद्राची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान येथील अधिष्ठाता प्रा. मिता कोटेचा, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश आडे, विभागीय केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. दिगंबर मोकाट यावेळी उपस्थित होते. यावेळी सहसुविधा केंद्रात औषधी वनस्पतींचे संग्रहालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये अश्वगंधा उत्पादक जनकीलाल जाट, तुळस उत्पादक हेमंत पटेल, सफेद मुसळी उत्पादक विनायक येऊल व जयेश मोकाशी, चंदन उत्पादक राजेंद्र गाडेकर, सामूहिक शेतीचे प्रोत्साहक सुभाष थोरात यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आयुष मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()