देशात आता ‘ब्रॕण्डिंग आयसीएआर;भारतीय कृषी संशोधन परिषदेचा निर्णय

icar
icar
Updated on

नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये चालणाऱ्या घडामोडींची माहिती सर्वसमान्यांना होत नाही. हे चित्र बदलावे याकरिता परिषदेने पुढाकार घेतला असून ‘ब्रॅण्डिंग आयसीएआर’ ही मोहीम त्याअंतर्गत राबवली जाणार आहे.

आयसीएआर अंतर्गत देशातील कृषी संशोधनाची दिशा ठरवली जाते. त्याकरिता विविध पिकांवर काम करणाऱ्या संबंधित राज्यातील संस्थांना निधीची तरतूद होते. देशातील कृषी विद्यापीठांचे नियंत्रणदेखील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून केले जाते. परंतु चार भिंतींआडच्या संशोधनाची तसेच त्या संस्थामध्ये होणाऱ्या कामकाजाची माहिती सर्वसामान्यांना होत नाही. 

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राला देखील निवडक शेतकऱ्यांना बोलावण्याची परंपरा आहे. अशा आयोजनाबाबत देखील अनेक शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे इच्छा असून देखील त्यांना अशा कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. परिणामी, संशोधन संस्था तसेच शेतकऱ्यांमध्ये दरी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच कारणामुळे अनेक शेतकरी संशोधन संस्थांना पांढरा हत्ती संबोधतात. ही परिस्थिती बदलावी याकरिता आता भारतीय कृषी संशोधन परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता देशव्यापी ‘ब्रँडिंग आयसीएआर ही मोहीम राबविली जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा संशोधन संस्थान विषयीचा विश्‍वास वाढीस लागेल अशी अपेक्षा ‘आयसीएआर’ला आहे. त्याची दखल घेत इंदूर येथील भारतीय सोयाबीन संस्थेने शुक्रवार (ता. ११) पासून आपल्या संकेतस्थळात बदल केला आहे. नव्या अपडेटेड संकेतस्थळाचे लोकार्पण सोयाबीन संस्थेच्या स्थापना दिवसाला करण्यात आले.

समाजमाध्यमांचा होणार वापर
परिषदेने संदर्भात एक पत्र काढले असून देशभरातील सर्व कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था यांना पाठविण्यात आले आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची सूचना या पत्रातून करण्यात आली आहे. त्याकरिता केंद्रीय संशोधन संस्थांनी फेसबुक पेज सुरू करावे, ट्विटर अकाउंट उघडावे त्यासोबतच व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या पर्यायाचा देखील प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अॅग्रोवनच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ब्रॅण्डिंग आयसीएआर मोहीम राबविण्याविषयीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. त्यानुसार लवकरच केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून माहिती-तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. 
- डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

संकेतस्थळही सुधारणार
सध्या असलेल्या संशोधन संस्थांच्या संकेतस्थळात देखील अमूलाग्र बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत वेबसाइटवर माहिती नोंदवावी. त्यावर येत्या काळात होणाऱ्या कार्यक्रमाबाबत  नोंद ठेवावी असेही पत्रात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.