Farmer: शेतकऱ्यांनो, घ्या पक्की पावती...

Farmer Slip: अनुदानासाठी आवश्यक, शेतमाल विक्री करताना घ्यावी काळजी
Farmer
Farmeresakal
Updated on

हिंगोली, यावर्षी कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे उत्पादन घटले. अन् त्यात भावही कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून, अनुदानासाठी सोयाबीन विक्री केल्याच्या पक्क्या पावतीची आवश्यकता असते. त्यासाठी सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांनी पक्की पावती घेणे आवश्यक आहे. अनेक जण पावती घेण्याचे टाळत असतात याचा फायदा मात्र व्यापाऱ्यालाच होत असल्याचे चित्र आहे. यामुळे विक्री केलेल्या शेतमालाच्या पावत्या घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. यावर्षी उत्पन्न घटले असले तरी शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा होती. पण, बाजारात सोयाबीन विक्रीस येताच दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिवाळीचा सण जवळ आल्याने बहुतांश शेतकरी सोयाबीन विक्री करत आहेत. परंतु, त्यांना व्यापाऱ्यांकडून पक्की पावती दिली जात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनुदानासाठी पक्क्या पावतीचा विचार होऊ शकतो. त्याकरिता शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केल्यानंतर त्याची पक्की पावती घ्यावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

सध्या बाजार समितीत ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० प्रतिक्विंटल असा भाव सोयाबीनला मिळत आहे. यावर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, उतारा देखील घटला आहे. एका बॅगला सात ते आठ क्विंटल उतारा येणारे सोयाबीन यावर्षी मात्र तीन ते चार क्विंटल होत असल्याचे शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतरही धान्य विक्री करताना पक्की पावती घेणे आवश्यक आहे. यावर्षी जिल्ह्यात तीन लाख वीस हजार ३५५ क्षेत्रापैकी दोन लाख ४५ हजार ४३५ हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे.

Farmer
Crop Damage : डोळ्यांतून कोसळतो आता परतीचा पाऊस ...खरीप पिकांचे नुकसान; जलालखेडा परिसरात पावसाचे थैमान

यावर्षी पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली अन् त्यात भाव देखील कोसळले. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. सोयाबीनचा पाच हजाराच्या वर दर आवश्यक आहेत. तसेच, काही व्यापारी मालाची विक्री केल्यावर पावत्या देत नाहीत. याचा फटका अनुदानाच्या वेळी बसतो. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी पावत्या घेतल्या पाहिजेत.

- गुणाजी कोकरे, शेतकरी

शेतकऱ्यांजवळ शेतमाल आल्यावर व त्यात सणवार असल्यास नेहमीच भावात घसरण होते. यावर्षी देखील तसेच झाले. पाच हजारांच्या आत भाव आले आहेत. यापेक्षा अधिक भाव असणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी भाव पडतात. शेतकऱ्यांना फटका बसतो, त्यात भोळे शेतकरी शेतमाल विक्री केल्यावर पावत्यांची मागणी करत नाहीत. याचा फायदा व्यापारी घेतात शेतकऱ्यांनी पावत्या घेतल्या पाहिजेत.

- दिलीप रामगीरे, शेतकरी

Farmer
Yeldari Dam : येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले : विद्युत निर्मितीसह ६८०२ क्युसेक्स विसर्ग सुरू

हिंगोली बाजार समिती अंतर्गत शेतमाल खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना हिशेबपट्टी पक्की द्यावी, अशा सूचना केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना माल विक्री केल्यानंतर त्यांना पक्की पावती देण्यात येते. शेतकऱ्यांनी देखील पक्क्या पावतीची मागणी करून आठवणीने घ्यावी.

- नारायण पाटील, सचिव, बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.