पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित युवा महिलेने हिंम्मत, धडाडी, ‘फायनान्स’ विषयातील शिक्षण, ज्ञान व कुशल व्यवस्थापन यांच्या बळावर १२ हजार ब्रॉयलर पक्षांचा व्यवसाय यशस्वी केला आहे. घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून व्यवसायाकडे काटेकोर लक्ष देताना त्यांनी एक कोटींपर्यंत उलाढाल पोचवली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सांगली जिल्ह्यात पळशी (खानापूर- विटा नजीकचे) येथे तुषार पाटील यांचे कुटुंब राहते. तुषार एका कंपनीतील नोकरीचा अनुभव घेऊन आता पूर्णवेळ निर्यातक्षम द्राक्षशेती पाहतात. त्यांच्या पत्नी प्रतीक्षा पाटील (माहेरच्या शैला शिंदे) तब्बल १२ हजार ब्रॉयलर पक्षांच्या पोल्ट्रीची जबाबदारी पाहतात. त्यांचे या व्यवसायातील कार्य समस्त पोल्र्टी व्यावसायिकांसाठी आदर्श असेच म्हणायला हवे.
उच्चशिक्षित शैला यांची पार्श्वभूमी
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे या दुष्काळी गावातील बाळासाहेब शिंदे हे शैला यांचे वडील. आई सौ. सुमन, भाऊ प्रवीण आणि संदीप असे त्यांचे कुटुंब. शैला यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून राष्ट्रीय अॅथलेटिक्स (८०० मीटर धावणे) स्पर्धेत यश संपादन केले. पुणे येथून एम.कॉम, एमबीए (फायनान्स) व डिप्लोमा इन टॅक्सेशन या पदव्या घेतल्या. पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये फायनान्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काही काळ अनुभव घेतला.
पोल्ट्री व्यवसायातील करिअर
पहिला अनुभव
सन २०१२ मध्ये सात हजार चौरस फुटाचे पहिले शेड उभारले. ४५ दिवसांनी पहिल्या बॅचची विक्री झाली. तेव्हा एक लाख रुपये मिळाले. ते पाहून घरातील सर्वांना खूप आनंद झाला. त्यानंतर उत्तेजन मिळत गेले आणि व्यवसायाची दिशा
ठळक होत गेली.
आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात
प्रति सात हजार चौरस फुटांचे दोन शेडस
सध्याची पक्षी संख्या १२ हजार
सण, समारंभ तसेच वर्षांतील मागणी ओळखून त्यानुसार पुरवठा होण्यासाठी तीनहजार, ६००० अशा पक्षांच्या बॅचेस
दर ४५ दिवसांची बॅच
पक्षांना खाद्य देण्यासाठी स्वतःची फीडमील
त्यामुळे त्यावरील खर्चात २० ते २५ टक्के बचत
३००० पक्षांसाठी वयानुसार दररोज १०० किलोपासून ते एक टनांपर्यंत खाद्याची गरज.
शेडची स्वच्छता आणि खाद्य नियोजनातूनच पक्षांची वाढ.
चांगल्या ‘ब्रीड’च्या पक्षांची खरेदी.
स्वतः पक्षांना लसीकरण करतात.
कच्च्या मालाची शेतकरी आणि मार्केटमधून खरेदी विक्री
कोल्हापूर, पंढरपूर, गोवा, कर्नाटक, नागज, शिरढोण
प्रति १२ हजार पक्षांसाठी प्रति बॅच सुमारे २० लाख रुपयांचे भांडवल लागते. वर्षात पाच बॅचेस झाल्यास उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत
शैला यांनी दिलेल्या टीप्स
एक- दोन बॅचेसचा नफा वा तोटा पाहून गणीत ठरवता येत नाही. वर्षभर सातत्य ठेवले तर नफा होऊ शकतो.
सण-समारंभ, वर्षातील मागणी असलेले दिवस असे शेड्यूल तयार करूनच त्यानुसार बॅच घेण्यासाठी पक्षांची संख्या ठरवावी.
व्यवहारातील अनुभव
शैला सांगतात की ज्या कंपनीकडून पक्षी खरेदी व्हायची त्यांनाच पक्षी दिले जायचे. पुढे काही गोष्टी पटल्या नाहीत. मग व्यापाऱ्यांशी संपर्क केला. मार्केटदरापेक्षा किलोला ५ रुपये दर कमी मिळायचा. त्यामुळे स्वतः मार्केटमध्ये उतरले. जुन्याजाणत्यांशी संपर्क केला. त्यांना योग्य दरात विक्री केली. पक्षांचे वजन, गुणवत्ता पाहून मागणी वाढली. दरही वाढवून मिळाला. त्यानंतर मध्यस्थ नसल्याने थेट विक्री सुकर झाली.
शैला यांच्याकडून घेण्याजोगे -
शिक्षण
पोल्ट्री व्यवसायातील कोणतेही ज्ञान नव्हते. विटा परिसरातील अनुभवी व्यक्तींना भेटून ज्ञान मिळवले. डॉ. पोळ यांनीही मार्गदर्शन केले.
अभ्यास
व्यवसायातील प्रत्येक बारकावा, प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा जाणून त्यानुसार सुधारणा
कष्टांची तयारी
सकाळी सहापासून ते रात्री दहापर्यंत अखंड काम घरचा स्वयंपाक, अन्य जबाबदाऱ्या, मुलगी मनवाचे संगोपन आदी सांभाळून व्यवसायाचे नियोजन पती तुषार, सासरे अरविंद, सासू विमल यांची समर्थ साथ.
संकटातही धडाडी
चिकन खाल्याने कोरोना होतो असा समज लोकांमध्ये पसरला होता. पक्षांचे दर प्रचंड घसरले. अशावेळी शैला यांनी वेळ न दवडता मनुष्यबळ घेऊन परिसरातील गावांमध्ये जाऊन ग्राहकांत प्रबोधन करीत थेट विक्री केली. संकटातही साठ हजार रुपयांचा नफा अशा रितीने मिळवला.
भविष्यातील तरतूद
देशी कोंबड्यांची मोठी हॅचरी उभारण्याचा विचार
कोणताही व्यवसाय हलका नसतो. तुमचे ज्ञान पणाला लावून तो तुम्ही मोठा करू शकता. मी तेच केले आहे.
शैला शिंदे याच नावाने ओळख
लग्नानंतर मुलींचे नाव बदलले जाते. शैला यांचे सासरचे नाव प्रतीक्षा पाटील असे झाले. मात्र व्यवसायात त्या माहेरच्याच नावाने परिचित होत्या. आजही हेच नाव रूढ झाले आहे.
- शैला शिंदे, ८६६९५६७८२२, ९५२७६७९०६६
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.