पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांत विमा कंपनीकडे माहिती द्यावी; विनयकुमार आवटे

हवामानशास्त्र विभागाने राज्यात ७ ते ९ मार्चदरम्यान काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली
Pradhan Mantri Fasal Bima Yojana crop damage informed insurance company within 72 hours
Pradhan Mantri Fasal Bima Yojana crop damage informed insurance company within 72 hoursesakal
Updated on

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमासंरक्षित पिकाच्या गारपीट, अवेळी पाऊस अशा नैसर्गिक कारणामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह संबंधित विमा कंपनीकडे सादर करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

हवामानशास्त्र विभागाने राज्यात ७ ते ९ मार्चदरम्यान काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे अशा घटना घडून विमासंरक्षित पिकांचे नुकसान झाल्यास महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी त्याची माहिती ७२ तासांच्या कालमर्यादेत संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा घटनांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या स्वरूपानुसार रक्कम शेतकऱ्यांना देय असते. सध्या रब्बी हंगाम सुरू असून, यामधील गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा पिकांना विम्याचे संरक्षण असल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकेल.

नुकसानीबाबतची माहिती शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या पर्यायांचा वापर करता येईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.