PM Kisan Samman Yojana : महत्वाची बातमी! 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 'हे' काम त्वरित करा

शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक आधार देऊन त्यांना शेतीकामासाठी गरजेवेळी पैसे उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून किसान सन्मान योजना राबविण्यात येत आहे.
PM kisan sanman nidhi yojana
PM kisan sanman nidhi yojanagoogle
Updated on
Summary

शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही, त्यांनी त्वरित गावातील पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून घ्यावे.

कऱ्हाड : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रूपये मिळतात. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये मिळते. ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना अद्याप १३ हप्ते वितरित झाले आहेत. या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

अजून काही शेतकऱ्यांची आधार जोडणी बाकी आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजे १४ वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा होणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील पोस्टात बँक खात्याला आधार नंबर जोडून घ्यावा, असे आवाहन येथील प्रवर डाक अधीक्षक एम. डी. पाटील, सहायक डाक अधीक्षक विजय कदम यांनी केले आहे.

PM kisan sanman nidhi yojana
Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक आधार देऊन त्यांना शेतीकामासाठी गरजेवेळी पैसे उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून किसान सन्मान योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार नंबर बॅंक खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे. ते करताना राष्ट्रीयीकृत बॅंकेत अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा विचार करून गावातील पोस्टातच बॅंक खाते उघडून तेथे आधार नंबर संलग्न करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

PM kisan sanman nidhi yojana
Koregaon : जमिनीचा वाद टोकाला; जाधव कुटुंबावर पिता-पुत्राकडून कोयत्यानं सपासप वार, नाकाचं हाड फॅक्चर

आधार नंबर संलग्न करण्याची मुदत १५ मेपर्यंत आहे. त्यामुळे तातडीने पोस्टात खाते उघडून आधार नंबर संलग्न केल्यास जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. गावातील पोस्ट ऑफिसमधूनच (Post Office) पैसेही काढता येतील. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नाही, त्यांनी त्वरित गावातील पोस्ट ऑफिसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून घ्यावे. हे खाते उघडण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत जाण्याची गरज नाही. त्यांच्या गावातील पोस्ट ऑफिसमधून हे खाते उघडता येईल. आधार व मोबाइल नंबर देऊन खाते उघडता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.