कसावापासून स्नॅक्‍सनिर्मिती...

कसावापासून स्नॅक्‍सनिर्मिती...
Updated on

अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कसावा महत्त्वाचे पीक आहे. कसावापासून २०० ते ५०० कॅलरी मिळतात. यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त कार्बोदके आहेत. कंदाच्या पानांमध्ये प्रथिने आणि काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. 

उकडलेला कंद 
घरगुती खाद्य म्हणून कंदाचा वापर केला जातो. कंद स्वच्छ धुवून त्याची साल काढली जाते. एका भांड्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून कंद मऊ होईपर्यंत उकडावा. उकडल्यानंतर पाणी फेकून द्यावे. शिजवलेला कंद रस्सा भाजी किंवा इतर पदार्थांसोबत खाऊ शकतो. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तळलेले स्नॅक्‍स 
कसावा पक्का वडा

कसावा पिठासोबत मैदा, हरभराडाळीचे पीठ, मीठ, मिरची पावडर, सोडा, हिंग व तेल वापरून हा पदार्थ तयार करतात. हे सर्व घटक एकत्रित करून त्याची मऊसर कणीक केली जाते. ही कणीक  वेगवेगळ्या साच्यामध्ये बसवून आकार दिला जातो. त्यानंतर तळले 
जाते.

कसावा स्वीट फ्राइस 
हा पदार्थ तयार करण्यासाठी कसावा पीठ, मैदा, सोडा व तेल वापरले जाते. हे सर्व घटक एकत्र करून कणीक मळली जाते. कणीक एक तास तशीच मळून ठेवली जाते. त्यानंतर साच्याचा साह्याने वेगवेगळे आकार बनवून गरम तेलात तळली जाते. त्यानंतर त्याला साखरेच्या पाकात बुडवून वरून लेप  लावला जातो. 

कसावा शेवया व पास्ता 
 कसावा पीठ, मैदा आणि मीठ एकत्र करून कणीक मळली जाते. शेवया आणि पास्ता यंत्राच्या साह्याने बनवून वाळवतात.

बेकरी पदार्थ  
मैद्याचा काही भाग आणि कसावा पिठाचा वापर 
करून बिस्किटे, कुकीज, कप केक, केक, ब्रेड तयार करतात.

कसावा पिकाचे महत्त्व 
कसावा हे महत्त्वाचे कंदपीक आहे. यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. भारताचा विचार करता तमिळनाडू आणि केरळमध्ये सर्वात जास्त कसावा लागवड आहे. कसावाची प्रतिहेक्टरी उत्पादनक्षमता ७० ते ९० टन आहे, परंतु आपल्याकडे प्रतिहेक्टरी २५ ते ३० टन उत्पादन मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे पारंपरिक पद्धतीने पीक लागवड आणि व्यवस्थापन. याचबरोबरीने सुधारित जातींची अत्यंत कमी प्रमाणात लागवड आहे. येत्या काळात या पिकामध्ये चांगली संधी आहे. केंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेने कसावाच्या १९ सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत. यातील काही जाती रोग प्रतिकारक, लवकर तयार होणाऱ्या जाती आहेत. याचबरोबरीने स्टार्च निर्मितीसाठीदेखील उपयुक्त आहेत.

संस्थेने स्टार्चचे प्रमाण अधिक असलेल्या कसावाच्या जाती विकसीत केल्या आहेत. यामध्ये श्री रेखा (२७ ते ३१ टक्के), श्री शक्ती (२७ ते ३२ टक्के), श्री अतुल्या (३०.२ टक्के), श्री प्रभा (२६ ते २९ टक्के), श्री प्रकाश (२९ ते ३१ टक्के), श्री सध्या (२९ ते ३१ टक्के) या जातींचा समावेश होतो. हे पीक १० ते १२ महिन्यांत तयार होते. बाजारपेठेतील मागणीनुसार हे पीक १ ते २ महिने काढणी न करता शेतात ठेवू शकतो. मात्र, कंद काढणीनंतर २ ते ३ दिवसांत त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

 डॉ. संकेत मोरे, ९६०१२६६६३६  डॉ. नम्रता गिरी, ७०१२०२७९२७  (केंद्रीय कंद पीक संशोधन संस्था, त्रिवेंद्रम, केरळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.