नेवासे : तालुक्यातील वरखेड येथे एका दहा वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली असून मंगळवार (ता. ६) रोजी रामडोह रस्त्याच्या पाटचारी परिसरात डोके छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहीती समजताच नेवासे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आपल्या आईसह सावत्र वडिलांकडे राहून पोटाची भूक भागविण्यासाठी दारोदारी भाकरी मागणाऱ्या या निष्पाप बालकाची इतकी निर्घृण हत्या बाहेरील कोण करणार? एकंदरीत या हत्येची संशयाची सुई 'सावत्र घरा'कडेच आहे हे मात्र निश्चितच. पोलिसांनी त्याच दिशेने तापास केल्यास नक्कीच या हत्यातील खूनी समोर येतील. (ten-year-old boy was killed in Varkhed)
बारकू (टोपणनाव) समाधान खिलारे (वय १०, राहणार बुलढाणा, हल्ली वरखेड, ता. नेवासे) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी , मयत बारकू हा गेली आठ-नऊ वर्षांपासून आपल्या दोन भाऊ व आईसह सावत्र वाडीलांसमवेत वरखेड येथे वास्तव्यास होता. दरम्यान बारकूच मृतदेह आज पहाटे रामडोह रस्त्यालगतच्या पाटचारी परिसरातील रस्त्याचे कडेला डोक्याची छिन्नविच्छिन्न अवस्थेत नागरिकांना दिसला.
या घटनेची माहिती नागरिकांनी नेवासे पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय करे, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पोलीस फुजफाट्यासह घटनस्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
मयत बारकूचा आई व सावत्र वडील समाधान यांच्याकडून नेहमीच छळ होत असल्याची चर्चा वरखेड गावात ऐकायला मिळत आहे. दाहवर्षीय बारकू हा आपली पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी गावात भाकरी मागत होता असेच समोर आले आहे. त्याचा स्वभाव खूपच गरीब होता व तो नेहमी भीतीच्या सवाटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात. त्यामुळे त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यासारखे बाहेरचे कोणीही असण्याची शक्यताच नाही. असे अनेक ग्रामस्थांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.
लवकरच आरोपींना पकडू : विजय करे
या बालकाच्या हत्येबाबत नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. यातील खऱ्या गुन्हेगारांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील. पोलीस तपास जलद गतीने चालू आहे. असे नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.