कोपरगाव - गेल्या वर्षभरात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील विविध शाखांतील तब्बल एक हजार २२४ विद्यार्थ्यांना नामांकित २११ कंपन्यांत आकर्षक पॅकेजची नोकरी मिळाली.
३४ विद्यार्थ्यांना कॅनडा, तैवान, रशिया, युके, ट्युनिशिया या देशांतील नावाजलेल्या विद्यापीठांत जाऊन संशोधन करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतलेली ही गरूडझेप संस्थेच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी दिली.
ते म्हणाले, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, बी. फार्मसी, डी. फार्मसीसह विविध अभ्यासक्रमांच्या शाखेतील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. बऱ्याचदा अंतिम वर्षाची परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हाती नामांकित कंपनीतील नोकरीची आर्डर असते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींनी आकर्षक पॅकेजच्या नोकऱ्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात समाधानाचे वातावरण होते. ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात.
एका अर्थाने संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांतीतून आर्थिकक्रांती साकार होते आहे. चांगल्या पॅकेजची नोकरी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ग्रामीण भागात संस्थेच्या माध्यमातून होत असलेला हा बदल नजरेत भरणारा आहे.
बेंचमार्क आयटी सोल्यूशन्स कंपनीने नुकतीच कॅम्पस इंटरव्ह्युद्वारे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या यश हलवाई, संकेत पानगव्हाणे, ऋषिकेश पवार, वैष्णवी पवार, निशा आगलावे, संस्कृती केकाण, प्रांजल परजणे, तेजस क्षीरसागर, मयूर मोरे, ओम सबणे, तेजस गुंजाळ व जयवंत वानखडे या १२ विद्यार्थ्यांची प्रत्येकी सहा लाख रुपये वार्षिक पॅकेज देऊन नोकरीसाठी निवड केली.
- नितीन कोल्हे, अध्यक्ष संजीवनी ग्रुप ऑफ इन्सिट्यूट, कोपरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.