१० लाख वीजग्राहकांना साडेबारा कोटींचा परतावा; अहमदनगर मंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजाचे बिलांमधून होणार समायोजन

व्याजाच्या रुपाने १२ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यांतील वीजबिलांतून समायोजित केला आहे.
12 5 crore refund to 10 lakh msedcl consumers security deposit interest from bills Ahmednagar
12 5 crore refund to 10 lakh msedcl consumers security deposit interest from bills AhmednagarSakal
Updated on

Ahmednagar News : वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असते. ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन, सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी २०२३-२४ मध्ये महावितरणच्या अहमदनगर मंडळातील ९ लाख ८८ हजार २६ वीज ग्राहकांना परतावा देण्यात आला.

व्याजाच्या रुपाने १२ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यांतील वीजबिलांतून समायोजित केला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे.

आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्रचना करण्यात येते. त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.

याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारति करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल, तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाने केली आहे.

वीज ग्राहकांच्या जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी अहमदनगर मंडळांतर्गत अहमदनगर ग्रामीण विभागातील १ लाख ७९ हजार २५३ ग्राहकांना २ कोटी ३० लाख २२ हजार, अहमदनगर शहर विभागातील २ लाख ७५ हजार ७४३ ग्राहकांना ३ कोटी ९७ लाख १४ हजार,

12 5 crore refund to 10 lakh msedcl consumers security deposit interest from bills Ahmednagar
Nashik Teachers Constituency Election 2024 : ‘शिक्षक मतदार’साठी उद्या मतदान; निवडणूक रिंगणात २१ उमेदवार

कर्जत विभागातील १ लाख ४३ हजार ७८२ ग्राहकांना १ कोटी ९८ लाख ६ हजार, संगमनेर विभागातील ३ लाख २ हजार ७३९ ग्राहकांना ३ कोटी ४० लाख ४१ हजार, श्रीरामपूर विभागातील ८६ हजार ५०९ ग्राहकांना १ कोटी ५७ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

एकूण ९ लाख ८८ हजार २६ ग्राहकांना १२ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा परतावा समायोजित केला आहे. अहमदनगर मंडळाअंतर्गत संबंधित वीजग्राहकांना यापूर्वी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. सदर सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

12 5 crore refund to 10 lakh msedcl consumers security deposit interest from bills Ahmednagar
Ahmednagar MIDC Staff : एमआयडीसीतील कामगारांना पगारवाढ; बक्षीस, बोनस, वार्षिक सहल, सुट्ट्यांचाही मिळणार लाभ

परिमंडळात ३२ कोटींचा परतावा

विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा केली जाते. त्याप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील २४ लाख ८२ हजार १३९ ग्राहकांना ३१ कोटी १४ लाख ६७ हजार रुपयांच्या व्याजाचा परतावा मागील दोन महिन्यांच्या वीजबिलांच्या माध्यमातून समायोजित केल्याचे महावितरणमधील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.