Bhandardara : भंडारदऱ्यातून १४३९ क्यूसेकने विसर्ग; प्रवरा नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना

भंडारदरा जलाशयात दुपारी चार वाजता १०.११९ दशलक्ष घनफूट साठा होताच जलसंपदा विभागाने स्पिलवेमधून ६०९ क्यूसेकने पाणी सोडले, तर यापूर्वी वीज ग्रहातून ८३० क्यूसेकने सोडण्यात आल्याने जलाशयातून १४३९ क्यूसेकने विसर्ग सोडला आहे.
1439 cusecs water discharge from Bhandardara citizens of Pravara river alert issue ahmednagar
1439 cusecs water discharge from Bhandardara citizens of Pravara river alert issue ahmednagarSakal
Updated on

अकोले : भंडारदरा जलाशयात दुपारी चार वाजता १०.११९ दशलक्ष घनफूट साठा होताच जलसंपदा विभागाने स्पिलवेमधून ६०९ क्यूसेकने पाणी सोडले, तर यापूर्वी वीज ग्रहातून ८३० क्यूसेकने सोडण्यात आल्याने जलाशयातून १४३९ क्यूसेकने विसर्ग सोडला आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे भंडारदरा जलाशयात वेगाने आवक होत असून, दुपारी दहा हजार १०० दशलक्ष घनफूट साठा होताच कार्यकारी अभियंता स्कूल काळे, उपअभियंता जोर्वेकर, शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी जलाशयातून १४३९ क्यूसेकने विसर्ग सोडला.

बुधवारी (ता. ३१) भंडारदरा धरणाची पाणीपातळी ७४३.४५ मीटर व पाणीसाठा १००३७ दलघफूट म्हणजेच ९०.९२ टक्के इतका झाला आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान बऱ्यापैकी असल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता, तसेच भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.

1439 cusecs water discharge from Bhandardara citizens of Pravara river alert issue ahmednagar
Ahmednagar News : धोकादायक इमारतीत भरते शाळा; अस्तगाव येथील प्रकार, पालकांचा जीव टांगणीला

त्यामुळे दुपारी चार वाजता धरणाच्या सांडव्यामधून ६०९ क्यूसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला. त्यामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे जलाशयापर्यंत प्रवरा नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

भंडारदरा धरणाची क्षमता ११०३९ दशलक्ष घनफूट असून, बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणामध्ये १००३७ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. कोंदनी वीज प्रकल्पातून २२१०, तर भंडारदरा वीज प्रकल्पातून ८३५ क्यूसेकने विसर्ग सोडल्याने दोन्ही वीजकेंद्र सुरू झाली आहेत. निळवंडे जलाशयात ४३७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ५२.५८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

1439 cusecs water discharge from Bhandardara citizens of Pravara river alert issue ahmednagar
Akole Crime : प्रॉपर्टीचा मोह! सावत्र आईने केला सुनेसह मुलाचा खून; चौघांवर गुन्हा दाखल, दोघे अटकेत

१५ ऑगस्टपूर्वी धरण भरणार

घाटघर, रतनवाडी, साम्रद धरणाच्या पाणलोट परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, उडदावणे येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. प्रचंड होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४६९ लदशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. ७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होत आहे. पावसामुळे भंडारदरा धरण १५ ऑगस्टपूर्वी भरण्याचे संकेत दिसू लागले आहेत.

आज अखेर पाऊस (मिमीमध्ये)

  • भंडारदरा - ७५.००- १२७४

  • घाटघर- ११५.०० -२३८८

  • पांजरे -९७.००- २०१०

  • रतनवाडी -११३.०० -२२२९

  • निळवंडे -२२.००- ७१३

  • आढळा -२.०० -२४५

  • अकोले -८.०० -५५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.