Childcare Scheme : एकल पालकांच्या मुलांना आता दरमहा 2000 रुपये; बालसंगोपन योजनेतून करा अर्ज

Savitribai Phule Child Care Scheme : कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या योजनेत सुरवातीला अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येते.
Childcare Scheme
Childcare SchemeSakal
Updated on

अहमदनगर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालकांच्या मुलांना आता दोन हजार २५० रुपये मिळणार आहेत. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये मिळत होते. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे.

कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या योजनेत सुरवातीला अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येते. पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असेल, तरच लाभ मिळतो. खरोखर गरजू असणाऱ्यास लाभ दिला जातो.

Childcare Scheme
Ahmednagar News : बोगस मालमत्ताधारक रडारवर; जीआयएस सर्व्हेला सुरूवात; २५०० मालमत्तांची मोजदाद पूर्ण

दुर्धर आजारी पालकांच्या मुलांनाही लाभ

एकच पालक असलेल्यांना एकल पालक म्हणतात. एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना लागू आहे. अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.

विभक्त महिलांच्या मुलांनाही लाभ

घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो. फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहतात, त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावे.

Childcare Scheme
Ahmednagar : ‘सेतू’ केंद्रचालकांची वाढली मनमानी; दाखल्यांसाठी आर्थिक पिळवणूक; सर्वसामान्यांची लूट, प्रशासनाचे दुर्लक्ष

आवश्यक कागदपत्रे

१) योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज

२) पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स

३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट

४) तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला

५) पालकांचा मृत्यू झाल्यास मृत्यूचा दाखला

६) पालकांचा रहिवासी दाखला

७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक

८) मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल)

९) रेशनकार्ड झेरॉक्स.

१०) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो

(दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो)

१०) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.