अहमदनगर : पावसाळ्याचे दोन महिने जवळपास संपत आले आहेत. मात्र, अद्याप काही भागात दमदार पाऊस झाला नाही. दमदार पावसाअभावी जिल्ह्यात ३१ गावे आणि १५३ वाड्यावस्त्यांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील सुमारे ५५ हजार नागरिकांची टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे.
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत असते. उत्तर भागातील संगमनेर, कोपरगाव, नेवासे या तालुक्यांतील काही मोजक्या गावांना एप्रिल, मे महिन्यांत हमखास पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने एप्रिल-मे महिन्यांत टँकर सुरू झाले. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांत पाऊस पडून टँकर कमी होतील, असा अंदाज होता. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा यावर्षी अधिक पाऊस झाला. काही तालुक्यांत दमदार पाऊस झालेला नाही. या गावांना पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडेच आहेत. त्यामुळे ३१ गावे आणि १५३ वाड्यावस्त्यांना पाणीटंचाई जाणवत आहे.
टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे. सध्या संगमनेर, कोपरगाव, नेवासे, पारनेर, श्रीगोंदे तालुक्यांत टँकर सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील २० गावांतील ६२ वाड्या-वस्त्यांवरील २५ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये टँकरच्या रोज ३७ फेऱ्या उपेक्षित आहेत. कोपरगाव तालुक्यातील २ गावांतील १५ वाड्यावस्त्यांवरील ४ हजार ४९६ नागरिकांसाठी २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नेवासे तालुक्यातील २ गावे ७ वाड्यावस्त्यांवरील २ हजार ६०५ नागरिकांची तहान टँकरने भागविली जात आहे.
पारनेर तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. ६ गावांतील ६९ वाड्यावस्त्यांवर १९ हजार ६१६ नागरिकांसाठी ६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केले जात आहे, तर श्रीगोदे तालुक्यात एका गावातील ४ हजार ५५ नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.