Golden Crown : साई चरणी ४३ लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण

आज एका साईभक्ताने साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
43 lakhs gold crown to Sai baba by devotee
43 lakhs gold crown to Sai baba by devoteesakal
Updated on

शिर्डी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीस्थळी देश विदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. श्रद्धा, सबुरीचा मंत्र दिलेल्या साई चरणी नतमस्तक होत असतात.

आलेले भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

या सोनेरी मुकुटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून सकाळी ‘शिर्डी माझे पंढरपूर’ या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढविण्यात आला. मूर्तीवर चढविलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्‍ताने संस्थानला आपले नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com