नगर ः जिल्ह्यातील कोरोनाचा जोर ओसरण्यासाठी गावांनी कंबर कसलेली आहे. जिल्ह्यातील ५७८ गावांनी वेशीच्या बाहेर कोरोनाला बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यात एक हजार ३१८ ग्रामपंचायती असून, त्यांमध्ये एक हजार ५६७ गावांचा समावेश आहे. गाव कोरोनमुक्त करण्याचे ठराव जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी केले आहेत. त्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणासाठी पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यात एक हजार ३८९ पथके स्थापन करण्यात आली आहेत. (578 villages in Nagar district became corona free)
जिल्ह्यात गाव कोरोनामुक्त होण्यासाठी ‘हिवरेबाजार पॅटर्न’चा वापर केला जात आहे. हिवरेबाजार कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या पद्धतीचा वापर जिल्ह्यातील सर्वच गावांत केला जाऊ लागलेला आहे. यासाठी हिवरेबाजारचे पोपटराव पवार ऑनलाइन पद्धतीने सरपंचांना मार्गदर्शन करीत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधित सापडत असल्याने त्यांना गावागावांत विलगीकरण करून ठेवण्यात येत आहे. ९१३ गावांमध्ये विलगीकरणाची सुविधा आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोना सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील ४१३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झालेल्या असून, त्यामध्ये ५७८ गावे आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायती लवकरच कोरोनामुक्त होतील. यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक गावे व ग्रामपंचायती कोरोनामुक्त झालेल्या आहेत.
तालुकानिहाय कोरोनामुक्त ग्रामपंचायती (कंसात गावे) ः
अकोले ः २२ (४२), संगमनेर ः ५२ (१००), कोपरगाव ः ३९ (४२), राहाता ः २३ (२३), श्रीरामपूर ः आठ (आठ), राहुरी ः ३१ (३६), नेवासे ः २० (२८), शेवगाव ः १५ (२८), पाथर्डी ः २९ (३२), जामखेड ः २२ (३३), कर्जत ः ४३ (६१), श्रीगोंदे ः २८ (५०), पारनेर ः २६ (३७), नगर ः ५५ (५८).
ग्रामपंचायतींमध्ये नगरची, तर गावांत संगमनेरची आघाडी
ग्रामपंचायतींबरोबरच गावे कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गावे व ग्रामपंचायतींचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये नगर तालुक्याने जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायती कोरोनामुक्त करण्यात आघाडी घेतलेली आहे. संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात सर्वाधिक गावे कोरोनामुक्त करण्यात आघाडी घेतली आहे. नगर तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती, तर संगमनेरात १०० गावे कोरोनामुक्त झाली आहेत.(578 villages in Nagar district became corona free)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.