नांदायला येत नाही म्हणून हत्या; भर बाजारात चिरला गळा

Accused arrested for killing wife by cutting throat in market marathi crime news
Accused arrested for killing wife by cutting throat in market marathi crime newsesakal
Updated on

राशीन (जि. अहमदनगर) : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये राशीनच्या बाजारपेठेत वाद झाला. तो विकोपाला गेल्याने पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. आज (शुक्रवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कर्जत पोलिसांनी काही तासांत आरोपीस अटक केली.

दीपाली राहुल भोसले (वय २५, रा. राशीन) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लता बारकू ऊर्फ गंगाराम आढाव (रा. राशीन) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल सुरेश भोसले (रा. राशीन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, दीपाली बहीण लतासह आज सकाळी नऊच्या सुमारास राशीन येथील कापड दुकानात कामावर जात होती. यावेळी रस्त्यावर अडवून पती राहुल भोसले याने, माझा मोबाईल दे, असे म्हणत तिला मारहाण केली. दीपालीच्या गळ्यावर व अंगावर चाकूने वार केले. त्यात ती जागीच कोसळली. दरम्यान, लता तिला वाचविण्यासाठी गेली असता तिच्यावरही राहुलने वार केला. त्यात तिच्या उजव्या डोळ्याला जखम झाली. हातातील जेवणाच्या डब्याने लताने आरोपीस मारहाण केल्याने तो घटनास्थळावरून पळून गेला.

Accused arrested for killing wife by cutting throat in market marathi crime news
हसन मुश्रीफ म्हणाले, 'अजूनही जिल्ह्याचा पालकमंत्री मीच'

त्यानंतर लताने नागरिकांच्या मदतीने जखमी दीपालीस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कर्जत किंवा नगरला पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तिला नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी भोसले राऊत वस्ती येथील काटेरी झुडपात लपून बसला होता. पोलिसांनी माग काढत त्याला दुपारी अटक केली. दरम्यान, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Accused arrested for killing wife by cutting throat in market marathi crime news
ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी : आमदार पाचपुते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()