आदर्श गाव राळेगणसिद्धी लॉकडाउन... सहाजण निघाले पॉझिटिव्ह

 Adarsh ​​Gaon Ralegan Siddhi Lockdown
Adarsh ​​Gaon Ralegan Siddhi Lockdown
Updated on

पारनेर ः आदर्श गाव राळेगणसिद्धी येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज एकाच दिवशी सहाजणांचा खाजगी लॅबमधील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर गावातील चार असे आज (ता. 20 ) एकाच दिवशी 10 रुग्ण तालुक्यात वाढले.

आज राळेगणसिद्धी येथील सहा, पोखरीत दोन  (पुणे येथे), दैठणे गुंजाळ एक व जवळा येथील एक असे 10 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. तालुक्यात कोरोनाने हळूहळू पाय पसरण्यास सुरूवात केली अाहे. दिवसेंदिवस तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा - पाथर्डीत बळजबरीने माजी नगरसेवक घुसला कोरोना वॉर्डात
  

तालुक्याची कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या अाता अर्धशतकाकडे वाटचाल करत असल्याने तालुक्यातील जनतेने अाता तरी सावध होणे गरजचे आहे. सुरूवातीस मुंबईपुणे येथून कोरोना आता तालुक्यात आला. मात्र, अाता स्थानिकांचीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लागण होऊ लागली आहे.

तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अनेकांना संपर्कातून अाता या रोगाची लागण होत आहे. अनेकांचे व्यावसाय तसेच प्रवास त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्या मुळे तालुक्यातील जनतेने काळजी घेणे अाता गरजेचे आहे.

आज 10 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. त्यामुळे अाता तालुका हादरला आहे. ज्या गावांमध्ये आज कोरोनाचे नव्याने रूग्ण आढळून आले आहेत, त्या गावांत एक दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले असल्याचेही तहसीलदार देवरे यांनी सांगितले. 

अनेक गावांमध्ये मागील दोन ते तीन दिवसांत  कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत, त्या गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळलेल्या घराचा शंभर मीटर अंतराचा परिसर कंन्टेंमेंन्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. तेथे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले अाहेत.  या परिसरात बाहेरील लोकांना जाण्यास व  अातील लोकांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या पूर्वी तालुक्यातील 18  गावांत कंन्टेंमेन्ट झोन जाहीर केला आहे. आज पुन्हा त्यात चार गावांची वाढ झाली आहे. राळेगणसिद्धी येथे आढळलेले रूग्ण हे मुंबई येथील आहेत. ते कोरोनामुळे राळेगणसिद्धी येथे आले आहेत. मात्र, त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ते दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांना राळेगणसिद्धीतील शाळेत क्वारंटाइन केले होते. त्या दरम्यान त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()