Agasti Sakhar Karkhana Election News : अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी समृध्दी विकास मंडळाने मुसंडी मारत शेतकरी विकास मंडळाचा सुफडा साफ करत निवडणुकीत गायकर गटाने पिचड पिता पुत्रांना मोठा धक्का दिला आहे. यामुळे अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील पिचड यांची गेल्या 28 वर्षांपासून असलेली सत्ता संपुष्टात आली आहे.
निवडणुकीत क्रॉस व्होटिंग न झाल्याने पॅनल टू पॅनल मतदान होऊन १५०० ते २००० फरकाने समृध्दी मंडळाचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र समोर आले आहे. आदिवासी सभासदांनी पिचड यांनी केलेल्या कामाकडे पाठ फिरवून समृध्दी मंडळ व भांगरे, लहामटे यांना साथ दिल्याने या निवडणुकीत पिचड पिता पुत्रांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. विजय प्राप्त होताच समृध्दी मंडळाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण फटाक्याची आतषबाजी व घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 25 सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. कारखान्याची ही निवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली होती. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीदेखील येथे येऊन सभा घेतली होती. कारखान्याच्या 21 जागांसाठी रविवारी 87.39 टक्के मतदान झाले होते.
माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळ तर त्यांच्या विरोधात आमदार डॉ. किरण लहामटे व जिल्हा बँक संचालक सीताराम गायकर यांच्या शेतकरी समृद्धी मंडळ यांच्यात लढत होती. यात राष्ट्रवादीचे सीताराम गायकर 49 पैकी 41 मते घेऊन विजयी झाले. तर, विरोधी राजेंद्र झावरे यांना 6 मते मिळाली. 2 मते बाद झाली. मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. तर विरोधकांनी त्यांना शह देण्यासाठी बाजी पणाला लावली होती. अखेर याच विरोधकांनी बाजी मारली.
अकोले गट
१) देशमुख माणिक रामराव ( विकास) --- २६६०, २) धुमाळ मच्छिंद्र पांडुरंग (समृद्धी) ---- ४१५३. विजयी, ३) नवले विक्रम मधुकरराव (समृद्धी) --- ४२१९ विजयी, ४) वाकचाैरे रामनाथ हाैशिराम (विकास)--- २३११, ५) वाकचाैरे कैलास भास्कर (समृद्धी) ---- ४८८२ विजयी, ६) शिंदे रामनाथ भिमाजी (अपक्ष) --- ११७, ७) शेटे संदिप किसन. (विकास) ----- २६०३
इंदोरी गट
१) खरात भाऊसाहेब निवृत्ती (विकास) ---२८३०, २)देशमुख अशोक भाऊसाहेब (समृद्धी)-- ४११०(विजयी), ३) पिचड वैभव मधुकरराव (विकास) --- २६७७, ४) नवले प्रकाश किसन (विकास) --- २५४१, ५) सावंत पाटिलबा किसन (समृद्धी) -३९९१ (विजयी), ६) हासे प्रकाश रामभाऊ (अपक्ष) ---- १९५, ७) हासे प्रदिप दत्ताञय (समृद्धी) ---- ३९६८(विजयी)
आगर गट
१) आरोटे अशोक झुंबरराव ( समृद्धी) ---- ४४१४ (विजयी), २) आरोटे सुधाकर काशिनाथ ( विकास)--२७११, ३) कोटकर सुनिल सुकदेव ( विकास) ---- २३९२, ४) नाईकवाडी परबत नामदेव ( समृद्धी)-- ४४१४(विजयी), ५) फोडसे संपत कारभारी (अपक्ष) ---- १७३, ६) शेटे किसन रावजी ( विकास) ---- २५२८, ७) शेटे विकास कचरु ( समृद्धी) --- ४१३८ (विजयी)
कोतुळ गट
१) घुले सुभाष बाबुराव ( अपक्ष) --८५, २) देशमुख मनोज शिवनाथ ( समृद्धी)- ४३०६ (विजयी), ३) देशमुख राजेंद्र नानासाहेब ( विकास) -२६४५, ४) लहामटे यमाजी सखाराम ( समृद्धी)- ४४६५(विजयी), ५)शेळके कैलास सीताराम ( समृद्धी)-- ४३५३ (विजयी), ६) शेळके रावसाहेब तुकाराम ( विकास) )--२४६३, ७) सावंत बाळासाहेब गणपत ( विकास)--२४३२
देवठाण गट
१) आंबरे गोरख लक्ष्मण (अपक्ष)-- ५७, २) उगले चंद्रभान फकिरबुवा ( अपक्ष)-- १६०, ३) उगले नामदेव बाळासाहेब ( विकास)-- २६४२, ४) बोंबले बादशहा दत्तु ( समृद्धी) --.४१४४ (विजयी) ५) वाकचाैरे भाऊसाहेब नामदेव ( विकास) -- २५७६, ६) वाकचाैरे जालिंदर वामन ( विकास) --२५३९, ७) वाकचाैरे रामनाथ बापूराव ( समृद्धी)-- ४१९७ (विजयी), ८) शेळके सुधीर कारभारी ( समृद्धी)-- ४००७ (विजयी)
महिला राखीव
१) नवले सुलोचना अशोक ( समृद्धी)--४५४६ (विजयी), २) नाईकवाडी रंजना भाऊसाहेब ( विकास)- २६२४, ३) मारुती आरती नानासाहेब ( विकास)-२६२३, ४) वाकचाैरे शांताबाई दगडु ( समृद्धी) -- ४२२२(विजयी), ओबीसी मिना नाथ पांडे (समृध्दी) विजयी
अनुसूचित जमाती. अशोक भांगरे (समृध्दी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.