Nagar Crime: 'यांचं मणिपूर, खैरलांजी करा' म्हणत कुटुंबावर जमावाचा हल्ला; नगरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार

याप्रकरणी ७१ जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nagar Crime: 'यांचं मणिपूर, खैरलांजी करा' म्हणत कुटुंबावर जमावाचा हल्ला; नगरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार
Updated on

निर्मळ पिंप्री (राहता) : "यांचं मणिपूर करा, खैरलांजी करा" असं म्हणत अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील निर्मळ प्रिंप्री गावात दोन दलित कुटुंबावर काही गावगुडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

४०० ते ५०० जणांच्या जामावानं या कुटुंबाच्या घराची आणि वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला आहे. याप्रकरणी ७१ जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Ahemad Nagar Communal violence dalit family from Nirmal Primri attacked by mob)

Nagar Crime: 'यांचं मणिपूर, खैरलांजी करा' म्हणत कुटुंबावर जमावाचा हल्ला; नगरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार
Winter Session : "आपण मित्र आहोत कोणीही मंत्री झालं तरी सेलिब्रेशन करु"; शिंदे-ठाकरे गटाच्या आमदारांची रंगली जुगलबंदी

पोलिसांचा मोबाईल हिसकावून मारहाण

हिंसाचारादरम्यान घटनास्थळी दोन पोलीस आले होते पण जमावानं त्यांचे मोबाईल हिसकावून घेऊन त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे. या प्रकारामुळं घाबरलेल्या कुटुंबानं पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम ठोकला. या कुटुंबातील लहान मोठ्यांसह सर्वजण भयभीत झालेले आहेत. सध्या गावात पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे, असं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

Nagar Crime: 'यांचं मणिपूर, खैरलांजी करा' म्हणत कुटुंबावर जमावाचा हल्ला; नगरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार
Sushma Andhare : "सरडा सुद्धा आत्महत्या करेल हो"; नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला

मणिपूरसारखी घटना घडवून आणा

"गावातल्या लोकांनी आमच्या घराची लाईट बंद केली. लाठ्या-काठ्या दगडफेक केली तसेच यांच्या आयाबहिणी धरा म्हाताऱ्या बायाही सोडू नका, मणिपूरसारखी घटना घडवून आणायची आहे. हे खूप माजले आहेत, यांना जाळूनच टाकायचं आहे. निवडणुकीपासून खूपच माजले आहेत हे, यांना गावातून बाहेर हाकलूनच द्यावं लागतं आहे," असं या गावगुडांनी म्हटल्याचा घटनाक्रम पीडित महिलेनं टीव्ही मीडियाशी बोलताना सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

Nagar Crime: 'यांचं मणिपूर, खैरलांजी करा' म्हणत कुटुंबावर जमावाचा हल्ला; नगरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार
Nawab Malik : विधान परिषदेत नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; फडणवीस म्हणाले,"आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी..."

पोटात लाथा मारुन दगडावर फेकलं - पीडीत मुलगी

तर "माझ्या पोटात लाथा मारुन मला दगडावर खाली फेकलं" असं या कुटुंबातील शाळकरी मुलीनं सांगितलं. माझ्या वडिलांना खूप मारलं आणि आमच्या घरातील धान्याच्या पोत्यांची दाणादिण केली आहे, अशा शब्दांत या मुलीनं आपल्यावरील हल्ल्याचं कथन केलं. (Marathi Tajya Batmya)

Nagar Crime: 'यांचं मणिपूर, खैरलांजी करा' म्हणत कुटुंबावर जमावाचा हल्ला; नगरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार
Retirement Plan : तुम्ही रिटायरमेंटसाठी तयार आहात का? स्वत:ला विचारा हे प्रश्न

खैरलांजीसारखी स्थिती करा

"ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानाचा राग गावातील लोकांनी आमच्यावर काढला. आम्ही रामदास साहेबांच्या पार्टीचे दोन-तीन उमेदवार निवडून आणले, आमच्या समाजाचा गावात उपसरपंच झाला. याचा विरोधी पार्टीनं आमच्यावर राग काढला असं या कुटुंबातील एका व्यक्तीनं सांगितलं. मणिपूरसारखं करा याचं असं ते म्हणत होते. आज जर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये लपलो नसतो तर आम्ही आज इथं राहिलो नसतो. (Latest Marathi News)

कोणावरही अशी वेळ येता कामा नये. खूपच वाईट स्थिती केलीए या गावगुंडांनी. यांची खैरलांजीसारखी परिस्थिती करा असंही ते म्हणतं होते, त्यांच्या दहशतीमुळं गावातील इतर दुसरे कोणी आमच्या मदतीसाठी आले नाहीत. या गावगुंडांना कडक शिक्षा झाली पाहिजे," असं एका पीडित पुरुषानं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Nagar Crime: 'यांचं मणिपूर, खैरलांजी करा' म्हणत कुटुंबावर जमावाचा हल्ला; नगरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचार
BBC New Chairman : मराठवाड्याचा सुपूत्र बीबीसीचा अध्यक्ष! कोण आहेत डॉ. समीर शहा? महाराष्ट्रातील या गावाशी आहे थेट कनेक्शन

पोलीस काय म्हणतात?

राहता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक युवराज आठरे यांनी सांगितलं की, "या घटनेमध्ये राहता पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही, शोध सुरु आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.