नेवासे शहर : नदी म्हटलं की सुसाट वेगाने वाहणारे पाणी डोळ्यासमोर दिसते. भल्याभल्यांना धडकी भरवणारी जागा. नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथील त्रिवेणी संगम. या नदीपात्रात लहानपणापासून गंगेच्या कुशीत वाढलेल्या एका वाघिणीने आजपर्यंत अनेकांना बाहेर काढले. काहींना जीवदानही दिले. पाण्यात बुडालेली शेकडो मृतदेह बाहेर काढणारी अहिल्याबाई शिवाजी बर्डे या ‘वाघीण’ नावाने प्रवरा संगम भागात परिचित आहेत.