संगमनेर: आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चौघा भावांचा शॉक लागून मृत्यू!

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळं ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
electric shock
electric shockelectric shock
Updated on

संगमनेर : आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चौघा भावांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथं घडली आहे. या घटनेमुळं वांदरकडा या गावावर शोककळा पसरली आहे. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळं हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. (Sangamner Four brothers who went down to lake for bathing died due to shock)

electric shock
रिमोट कंट्रोलचा प्रश्नच नाही, दोन्ही उमेदवार दिग्गज; राहुल गांधी स्पष्टच बोलले

सुत्रांच्या माहितीनुसार, अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे आणि विराज अजित बर्डे अशी मृत्यू पावलेल्या चौघा भावांची नावं आहेत. हे चौघेही वांदरकडा गावाजवळील बर्डे वस्तीत रहायला होते. या वस्तीजवळ छोटसं तळं असून या तळ्यावरुन महावितरणच्या वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. जेव्हा ही भावंड तळ्यात पोहण्यासाठी गेली तेव्हा या तारा तुटून तळ्यात पडल्या होत्या. पण पण्यातून वीजप्रवाह सुरु असल्याची बाब लक्षात आली नाही आणि ते थेट पाण्यात उतरले. यानंतर वीजेचा तीव्र झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

electric shock
लालू-राबडी यांच्यासह १६ जणांविरुद्ध सीबीआयची चार्जशीट; नितीश कुमार म्हणाले...

या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर वीजेच्या तारा तुटून पाण्यात पडल्याचं लक्षात आलं. यानंतर तातडीनं वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं तसेच पोलीस आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या.

electric shock
Amit Shah : ..त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं; अमित शहांनी सांगितला 'किस्सा'

दरम्यान, एकाच घरातील चार मुलांचा अशा अचानक पद्धतीनं मृत्यू झाल्यानं त्यांच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्याही मनाला ही बाब चटका लावून गेली. यावेळी संपूर्ण गाव शोकाकूल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.