संगमनेर : सुरक्षित व वेगवान वाहतुकीसाठी केलेले नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. संगमनेर तालुका हद्दीतील महामार्गावर एका वर्षात सुमारे १७ बिबट्यांचा वाहनांच्या धडकेमुळे मृत्यू ओढवला आहे.
संगमनेर तालुक्यात खेड- सिन्नर या राष्ट्रीय महामार्गावरील आळे खिंड ते कऱ्हे घाट अशा सुमारे ५० किलोमीटर अंतरामध्ये एकल, चंदनापुरी व कऱ्हे अशा तीन घाटरस्त्यांचा समावेश आहे. या महामार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने चौपदरीकरण केल्याने वन विभागाच्या क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यामुळे या परिसरातील बिबट्यांसह इतर वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पूर्वीच्या दुहेरी मार्गाऐवजी स्वतंत्र मार्गिका असलेल्या चौपदरी रस्त्यामुळे वाहनांच्या वेगातही वाढ झाली. महामार्गाची निर्मिती करताना २०१३ मध्ये केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने १४ अटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.
त्यात वन विभागाच्या हद्दीत भक्ष्याच्या शोधात वन्य प्राण्यांची ये-जा असणाऱ्या ठिकाणी रंबल स्ट्रिप्स किंवा गतिरोधक टाकणे, अंडरपास तयार करणे, अशा सूचनांचा समावेश होता. यासाठी मागील वर्षी वन विभागासह संबंधित विभागाने तालुका हद्दीतील मार्गाची पाहणी करून, भुयारी मार्गासाठी सर्वेक्षण केले होते. मात्र, हा प्रकल्प अद्यापही कार्यान्वित झाला नाही.
शिकारीसाठी बाहेर पडणारा बिबट्या वाहनांच्या वेगाचा अंदाज न आल्याने अपघातात मृत्युमुखी पडल्याच्या १७ घटना वर्षभरात झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.