Bullock Cart Race in Maharashtra: दत्त जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावात देवस्थान समितीने यंदा प्रथमच दोन दिवसीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. शर्यतीसाठी लोकसभागातून जमा झालेल्या सहा लाख रुपये निधीतून घाट बांधण्यात आला. या बैलगाडा शर्यतीत नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील ४०० बैलगाडा मालकांनी आपल्या सहभाग नोंदविला.
शर्यतीतील विजेत्यांना प्रथम ७५०००, द्वितीय ५५०००, तृतीय ३३०००, तर चतुर्थ क्रमांकासाठी २२००० रुपयांचे पारितोषिक ठेवले होते. दोन दिवसीय चाललेल्या शर्यतीमध्ये बारा व तेरा सेकंदांमध्ये घाट पार करणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी प्रती दोन विजेते घोषित करण्यात केले.
यांसह विभागीय बक्षिसांमध्ये शंभर गाडा मालकांचा सुद्धा सहभाग होता. दोन्ही स्पर्धकांनी आपला बैलगाडा बारा सेकंदांच्या आत घाटाचा पल्ला गाठला, तर फक्त ११.२०
इतक्या कमी वेळात घाट पार करणाऱ्या जुन्नर (जि. पुणे) तालुक्यातील बैलजोडीने सर्व बैलगाडाप्रेमींचे लक्ष वेधले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.