पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात

पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
Updated on
Summary

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा (Corona) आलेख कमी-जास्त होत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील ६३३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणाऱ्या ८२१ गावांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. (ahmednagar 821 villages in the district have overcome corona)

पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि"र्बंद", कापडबाजारात शुकशुकाट
Sakal

जिल्ह्यात एक हजार ५९६ गावे असून, एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या हद्दीसह नगर शहरात सध्या २२३५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शाळा, सीसीसी विलगीकरण केलेल्या गावांची संख्या एक हजार ८० आहे. जिल्ह्यातील एक हजार ५९६ गावांमध्ये खासगी, शासकीय रुग्णवाहिका पथक स्थापन केलेले आहे. एक हजार ३१८ ग्रामपंचायतींमध्ये लसीकरणासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांवर
sakal

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील ६३३ ग्रामपंचायत हद्दीतील ८२१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. इतर गावेही कोरोनामुक्त होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
40 वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर भाजप सत्तास्थानी; अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची खडतर वाटचाल
Corona Vaccine
Corona VaccineSakal

कोरोनामुक्त गावांत संगमनेरची आघाडी

जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. संगमनेर तालुक्यातील १०१ गावांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामपंचायतींचा विचार केला असता, नगर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. नगर तालुक्यातील ८६ गावांनी कोरोनावर मात केली आहे.

पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

ग्रुप ग्रामपंचायतीमुळे गावांची संख्या अधिक

जिल्ह्यात ग्रुप ग्रामपंचायती असलेल्या गावांच्या हद्दीतील काही गावे कोरोनामुक्त, तर काही गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आहेत. परिणामी, कोरोनामुक्त गावे सर्वाधिक असून, ग्रामपंचायतींची संख्या कमी दिसून येत आहे.

पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेडसह 'या' जिल्ह्यांना धोक्याची घंटा; येत्या तीन तासात जोरदार पाऊस!

आकडेवारी

ग्रामपंचायती : १३१८

बाधित रुग्णसंख्या : २७९०८९

बरे झालेल्या रुग्णांची संख्या : २७०९८२

रुग्णालयांतील रुग्णसंख्या : २२३५

विलगीकरणातील रुग्ण : १२०

कोरोनामुक्त ग्रामपंचायती : ६३३

कोरोनामुक्त गावे : ८२१.

पॉझिटिव्ह बातमी! अहमदनगरमधील 821 गावांची कोरोनावर मात
अहमदनगर: विधवा भावजयी बरोबर लहान दीराचा विवाह मोठ्या थाटात संपन्न
CORONA
CORONA

कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायती व कंसात गावांची तालुकानिहाय संख्या

अकोले : ३६ (७९), संगमनेर : ७८ (१०१), कोपरगाव : ५८ (६०), राहाता : ३२ (३२), श्रीरामपूर : २७ (२९), राहुरी : ४९ (५५), नेवासे : ३० (३९), शेवगाव : ५८ (७२), पाथर्डी : ५६ (५९), जामखेड : २८ (४७), कर्जत : ४६ (७१), श्रीगोंदे : १६ (४२), पारनेर : ३३ (४६), नगर : ८६ (८९).

(ahmednagar 821 villages in the district have overcome corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.