Ahmednagar News: नगर तालुक्यात तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात झालेले आहेत. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालेला असून तीन जण जखमी आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नगर - दौंड महामार्गावर अरणगाव शिवारात मेहेराबाद भुयारी पुलाजवळ कारने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (ता.२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. साहिल कैलास नेटके (वय १८) व अनिकेत बंडू साठे (वय १७, दोघे रा. वाळकी, ता. नगर) असे मयत युवकांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
अरणगावजवळील सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात वाळकी येथील दोघांचा मृत्यू झाला. त्या पूर्वी अहमदनगर - दौंड रोडवरच अरणगाव बायपास चौक येथे रविवार (ता. १९) सायंकाळी झालेल्या अपघातात संजय अर्जुन शिंदे (वय ३८, रा. शिंदेवस्ती, निंबळक बायपास चौक, ता. नगर) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलिस अंमलदार के. एस. हरिश्चंद्रे करीत आहेत.(Latest Marathi News)
अहमदनगर-जामखेड रस्त्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघांना कंटेनरने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.
नानाभाऊ एकनाथ पवार (वय ४५, रा. भाळवणी, ता. आष्टी, जि. बीड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. विजय बबन वडलिक (वय ३८, रा. भाळवणी, ता. आष्टी, जि. बीड) हे जखमी झाले आहेत. सारोळा बद्दी (ता. नगर) शिवारात शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
नगर-सोलापूर महामार्गावर दरेवाडी शिवारात कारने दुचाकीला दिलेल्या धडक दिली. त्यात दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना गुरुवार (ता.१६) ला घडली.
संतोष बालाजी गर्जे (वय २४, रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव, हल्ली रा. वाळुंज, ता. नगर) असे मयत युवकाचे नाव असून अपघातात प्रतीक विनायक उबाळे (वय १८, रा. वाळुंज) हा जखमी झाला आहे.
मंगळवार (ता.२१) दुपारी नगर-पाथर्डी रस्त्यावरील पिंपळगाव लांडगा शिवारातील तिंरंगा हॉटेलजवळ झालेल्या अपघातात शंकर गुंड (वय २६) (पारगाव, ता. नगर) हा युवक जबर जखमी झाला असून, त्यात उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.