NCP Politics : राष्ट्रवादीला ‘दादा’ वळणावर आणणार का?

श्रीगोंद्यात नाहाटांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला
NCP Ajit Pawar
NCP Ajit Pawar
Updated on

श्रीगोंदे : बहुचर्चित राजकारणी बाळासाहेब नाहाटा यांचा अनेकवेळा लांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला. येत्या ३ सप्टेंबरला (शनिवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश श्रीगोंद्यात होत आहे. मंध्यतरी माजी आमदार राहूल जगताप यांच्या मध्यस्थीने काही नेते राष्ट्रवादीत निघाले होते. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय गणिते बदलली असून नाहाटा वगळता इतरांनी राष्ट्रवादी प्रवेशाला नकारघंटा दाखविल्याचे सध्या तरी दिसतेय.

राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती पद नाहाटा यांना अजित पवार यांच्यामुळेच मिळाले. त्यामुळे नाहाटा आता राष्ट्रवादीत अधिकृतरित्या येत असून, त्यासाठी खुद्द अजितदादा येत आहेत. यापुर्वीच्या घडामोडीत अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, सिध्देश्वर देशमुख या नेत्यांनीही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती व त्यावेळी त्यांची तयारीही होती. आता मात्र नाहाटा वगळता इतरांनी थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

राज्यात सत्तांतर झाले आणि त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश रखडला अशीच स्थिती आहे. दरम्यान राष्ट्रवादी वाढणार असल्याचे संकेत मिळत असतानाच काही नेत्यांनी प्रवेशाबाबत यू-टर्न घेतल्याने नाहाटा हे एकटे प्रवेश करणार हे स्पष्ट होत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी ज्या पटीने वाढायला हवी होती तसे घडलेले नाही. माजी आमदार जगताप व पक्षाचे नेते घनशाम शेलार यांच्यात पक्षीय सुसंवाद नाही हे उघड गुपित आहे. कार्यक्रमात भलेही ते एकत्र दिसले तरी दोघांचाही सवतासुभा सुरु असतो हे सर्वमान्य आहे. मध्यंतरी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी थेटपणे पक्षावर, नेत्यांवर नाराजी दाखवली होती. या सगळ्या घडामोडीत आता अजित दादा पक्षाची विस्कटणारी घडी नेत्यांचा मेळ बसवून पुन्हा बसविणार का हे पाहावे लागेल.

इतर नेत्यांचे माहिती नाही मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय. यापुढचे राजकारण अजितदादा यांच्याच मार्गदर्शनाखाली करणार आहे.

- बाळासाहेब नाहाटा, सभापती, राज्य बाजार समिती महासंघ

मध्यंतरीच्या घटना वेगळ्या होत्या. आता बदल झाला आहे. जिल्हा परिषदेचे आरक्षण ठिक पडले तर काष्टीतून भाजपाची उमेदवारी मागणार आहोत.

- बाळासाहेब गिरमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.