Ahmednagar : घोषणांनी परिसर दणाणला; प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी, अंगणवाडी सेविकांचा ‘झेडपी’त यल्गार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्तीनंतरची थकीत रक्कम आदी लाभ तातडीने देणे.
Ahmedagar
AhmedagarSakal
Updated on

अहमदनगर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनने मंगळवारी (ता. २५) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला.

Ahmedagar
Mumbai Crime: प्रवाशाने चाकूचा धाक दाखवत ओला कार चालकास लुटले

या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख, सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, शोभा लांडगे, मंदा कसारा, माया जाजू, नंदा पाचपुते, अलका नगरे, संगीता विश्‍वास, रजनी क्षीरसागर, संगीता इंगळे, मन्नाबी शेख, अरुणा खळेकर,

अलका दरंदले, सुजाता शिंदे, मंगल राऊत, प्रतिभा निकाळे, निर्मला चांदेकर, शशिकला औटी, शोभा विसपुते, सुनीता धसाळ, मंदा निकम, शकिला पठाण, सविता दरंदले, सुनीता बोरुडे, सरला राहणे, शोभा खंडागळे, नंदा राजगुरू, कुसुम भापकर, मंगल राऊत, अरुणा डांगे आदी सहभागी झाले होते.

Ahmedagar
Mumbai Crime: प्रवाशाने चाकूचा धाक दाखवत ओला कार चालकास लुटले

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्त्यांनी शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध नोंदवला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, महिला व बालकल्याण विभाग यांच्या समवेत कृती समितीची चर्चा झाली होती.

त्यावेळी मंत्रिमहोदयांनी प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, अद्याप त्याची पूर्तता झाली नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्तीनंतरची थकीत रक्कम आदी लाभ तातडीने देणे, यांसह प्रकल्पाशी संबंधित विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Ahmedagar
Mumbai News : विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणार

या आहेत मागण्या

दरमहा अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनाला विनाविलंब सादर करून तो मंजूर करावा, आश्वासनानुसार ग्रॅच्युइटी मिळावी, तत्काळ सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, विनाविलंब अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल फोन द्यावा,

त्यानुसार नवीन मोबाईल फोन घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत, टीएडीएची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना देणे, २०२१-२२ व २०२२-२३ ची उर्वरित उन्हाळी सुट्टी देणे, दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळणे, सादिलच्या रकमेत वाढ करणे, अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ देणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.