Ahmednagar : ऊस लागवडीला ब्रेक; शेतकऱ्यांना ‘रोटेशन’ची चिंता; कमी पावसाचा परिणाम

अलीकडच्या पंचवीस, तीस वर्षांत कधी नव्हे तो पावसाचा निच्चांक झाला आहे.
land
landsakal
Updated on

सोनई - कमी झालेला पाऊस, मुळा धरणाची स्थिती, जायकवाडीला किती टीएमसी पाणी जाणार आणि यंदाच्या वर्षी शेतीकरिता किती आवर्तन राहणार याचा काहीच भरवसा नसल्याने दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी चिंतेत दिसत आहेत. रोटेशनचा भरोसा नसल्याने ऊस लागवडीला ब्रेक लागला. बदलते हवामान व पाण्याची खात्री नसल्याने गहू पेरणी घरच्यापुरतीच राहील, असे दिसते.

अलीकडच्या पंचवीस, तीस वर्षांत कधी नव्हे तो पावसाचा निच्चांक झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त हजेरी लावणारा पाऊस तब्बल तीन महिन्यांनंतर झाला. नेवासे तालुक्यातील अनेक गावांत ओढे, नाले व नद्यांना पाणीवाहिले नाही. परिणामी विहीर व कूपनलिकांच्या पाण्याचे भवितव्य अंधारमय आहे.

मुळा धरणाची स्थिती जेमतेम असल्याने पाण्याची ओढाताण होईल, असे चित्र दिसत आहे. समन्यायी पाणी धोरणानुसार मुळा, भंडारदरा धरणातून जायकवाडीला किती टीएमटी पाणी सोडण्याची वेळ येणार याची शेतकऱ्यांत चिंता आहे.शेतात सध्या असलेली कपाशी, सोयाबीन व तूर निघाल्यानंतर काय? हा प्रश्न शेतक-यांना पडलाआहे. मुळा धरणातून शेतीकरिता किती आवर्तन मिळणार याची खात्री

land
Ahmednagar : फिर्यादीच आरोपी; बेलवंडी पोलिसांकडून अटक; चिंभळे गोळीबार प्रकरण

नसल्याने नवीन ऊस लागवडी थांबल्या आहेत.अनेकांनी शेतीची मशागत करून ठेवली असली, तरी सरी पाडण्याचे धाडस होत नसल्याचे दिसते.दुष्काळसदृश स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिके घेणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस आणि गहू पिकाचे धाडस करावे. कमी पाण्याचे वाटाणा, हरभरा किंवा करडई पीक घेणे उत्तम.

-डॉ. अशोकराव ढगे, कृषी शास्त्रज्ञ.

land
Atiq Ahmed Murder Case : "कट्टर "हिंदूत्ववादी - परशुरामचा वंशज" ; अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांचा धक्कादायक खुलासा

अगोदरच मेटाकुटीस आलेला शेतकरी यंदाच्या कमी पावसामुळे अधिकच संकटात सापडला आहे. अतिवृष्टी, गारपीट व वादळाने झालेली नुकसान पदरात पडली नसताना आता दुष्काळाचे चटके बसत आहेत. जलसंपदा विभागाने शेतीकरिताचे आवर्तन जाहीर करावे.

- सुनील झिने, युवा शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.