Ahmednagar : विरोध करणाऱ्यांचे डोके तपासा ; डॉ. सुजय विखे

मनपाच्या एमआरआय सेंटरचे उद्‍घाटन
Ahmednagar
Ahmednagaresakal
Updated on

अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा डॉक्टर खासदार असल्यामुळे या भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. ज्या राजकीय लोकांचे डोके ठिकाणावर नाही, त्यांनी एमआरआय सेंटरमध्ये आपले डोके तपासून घ्यावे, त्यांच्यावर इलाज करण्यासाठी मी न्यूरोसर्जन आहे, अशा शब्दांत विखे यांनी आज विरोधकांचे कान टोचले.

Ahmednagar
Vastu Tips : घरातील दागिन्यांची दिशा बदला, घरात सोन्या-नाण्याची कमी पडणार नाही

महापालिका व लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने एमआरआय सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, सभागृह नेते विनित पाऊलबुद्धे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत.

Ahmednagar
Eye Care Tips: मुलांना कमी वयातच चष्मा लागलाय? हे 5 सुपरफुड्स डोळ्यांची दृष्टी सुधारतील

शहरातील उड्डाणपूल, नगर-करमाळा रस्ता, शहरातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आरोग्यसेविकांनी कोरोना संकट काळामध्ये नागरिकांचे जीव वाचवण्याचे काम केले. त्यांच्याही संकट काळात आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचा पाचशे रुपयांमध्ये सिटी स्कॅन केला जाणार आहे. मनपाच्या स्पर्धापरीक्षा केंद्राच्या जागेवर शहरातील जर कोणाला समाजोपयोगी कार्य सुरू करायचे असेल, त्यांनी पुढे यावे. चांगल्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप करू नका. मी या ठिकाणी माझ्या आजोबांच्या नावे डायलेसिस सेंटर सुरू करू इच्छितो. याचबरोबर १८ कोटी रुपये खर्चून सिव्हिल हॉस्पिटल येथे कॅथलॅब सेंटर उभे केले जाणार आहे.

Ahmednagar
Travelling Tips : पीरियड्स दरम्यान प्रवास करताना डॉक्टरांनी दिलेल्या या 6 टिप्स लक्षात ठेवा

महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, की नगर शहराबरोबरच नगर जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एमआरआय सेंटरच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना लाभ मिळणार आहे. प्रास्ताविक डॉ. अनिल बोरगे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापाड यांनी केले, तर उपायुक्त अजित निकत यांनी आभार मानले.

Ahmednagar
Career Tips : नवीन वर्षात घरी बसून करा ‘हे’ कोर्स आणि वाढवा तुमचे उत्पन्न

नगर शहर बदलतंय

आमदार संग्राम जगताप यांनी ‘नगर बदलतंय’ हा नारा दिला आहे, ते खरेच आहे. मनपाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले एमआरआय सेंटर हे राज्यातील महत्त्वाचे आरोग्याचे केंद्र बनणार आहे. या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे यावेळी विखे यांनी सांगितले.

असे आहे शुल्क

मेंदू एमआरआय १५००

मेंदू स्कॅनिंग ९००

मेंदू कॉन्ट्रास्ट ३०००

मेंदू एन्जिओग्राफी ३०००

डोळ्याचा एमआरआय- ८००

मणक्याचा एमआरआय १५००

एमआरआय सीपी २४००

कॉन्ट्रास्ट एमआरआय १५००

फिस्टिलोग्राम २४०० रु.

स्कॅनिंग ६००

सिंगल स्पाईन स्क्रीनिंग- २१००

स्पेक्ट्रोस्कॉपी १५००

ब्रेकियल फ्लेक्स

एमआरआय ...२४००

पोटाचा एमआरआय- ३०००

स्तनाचा एमआरआय- २४००

प्रोस्टेड ग्रंथीचा एमआरआय १८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.