अहमदनगर : शहर केमिस्ट असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. डॉक्टर्स, केमिस्ट, एमआर यांना एकत्र येण्यासाठी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ निर्माण केले. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात खेळाला महत्त्व दिले पाहिजे. खेळाच्या माध्यमातून एकमेकांमध्ये जिव्हाळा व प्रेम निर्माण होतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
वाडिया पार्क केमिस्ट परिवाराचे अशोक रेणू गुंटला यांच्या स्मरणार्थ आयोजित केमिस्ट चॅम्पियनशिप लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मुख्य प्रायोजक सिद्धी ग्रुप स्काय ब्रिजचे संचालक मनोज छाजेड, मुकेश छाजेड सहप्रायोजक श्रीदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित बडवे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, संजय चोपडा, विशाल गर्जे, डॉक्टर मिलिंद पोळ, सुनंदा रेणू गुंटला, डॉ. संतोष गांगर्डे, डॉ. हेमंत नाईक, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. गोपाल बहुरूपी, डॉ. नितीन नागरगोजे, डॉ. सचिन पाडुळे, डॉ. सचिन रक्ताटे, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. महेश जरे, डॉ. वैभव भोईटे, डॉ. हर्षवर्धन तन्वर आदी उपस्थित होते.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, की कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून खेळाची मैदाने बंद होती. आता ही मैदाने खुली करण्यात आली आहेत. केमिस्ट असोसिएशनने आपल्या मित्राच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून मित्रप्रेम व आपुलकी सिद्ध केली असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.