Ahmednagar : लॉ कॉलेजविरोधात सचिवांकडे तक्रार; विद्यार्थ्यांना गैरमार्गाने प्रवेशाचा आरोप

या संदर्भात गुरुवारी (ता.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Ahmednagar news
Ahmednagar newsesakal
Updated on

अहमदनगर : शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गैरमार्गाने प्रवेश दिल्याप्रकरणी छावा संघटनेच्या वतीने शिक्षण सचिवांकडे तक्रार केली आहे. गैरमार्गाने दिलेले प्रवेश रद्द करून प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवून यासंदर्भात चौकशीद्वारे दोषींवर कारवाईची मागणी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी केली आहे. या संदर्भात गुरुवारी (ता.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Ahmednagar news
Travelling Tips : पीरियड्स दरम्यान प्रवास करताना डॉक्टरांनी दिलेल्या या 6 टिप्स लक्षात ठेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित असलेल्या शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया शासन निर्णयानुसार ऑनलाईन, तसेच ऑफलाईन घेण्यात आली. मात्र, पात्र विद्यार्थ्यांना डावलून काही कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने संचालक मंडळ यांच्या संगनमताने भ्रष्टाचार करून प्रवेश देण्यात आला असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

Ahmednagar news
Career Tips : नवीन वर्षात घरी बसून करा ‘हे’ कोर्स आणि वाढवा तुमचे उत्पन्न

या संस्थेतील यापूर्वीची शिक्षक भरतीप्रक्रिया देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. संचालक मंडळाचे बदल अर्ज धर्मदाय उपायुक्तांकडे प्रलंबित असतानाही सध्याचे संचालक कोणत्या अधिकाराने कारभार करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पात्र विद्यार्थ्यांना डावलून गैरमार्गाने कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे ही गंभीर बाब आहे.

याप्रकरणी सखोल चौकशी करावी, डावललेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा व दोषी निवड समिती व संचालकवर गुन्हे दाखल करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे.दरम्‍यान, ही तक्रार लॉ कॉलेजसंदर्भात असली तरी इतरही संस्‍थानमध्ये असेच प्रकार होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.