Ahmednagar: नगरमधील काँग्रेस नेता अजित पवार गटाच्या मार्गावर? एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात गोंधळ

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.
Ajit pawar
Ajit pawar sakal
Updated on

Shrigonda Ahmednagar Political : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. १९ जानेवारीला ‘बापूं’च्या जयंतीचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो, हा त्यांचा खुलासा असला, तरी अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी या भेटीचा फोटो शेअर करीत ‘यशस्वी झालो’, असे सांगत नागवडे ‘दादां’सोबत येणार यावर शिक्कामोर्तब, तर केले नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

राजेंद्र व अनुराधा नागवडे यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आणि चर्चेला सुरुवात झाली. भेटीवेळी जिल्हाध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा उपस्थित होते. या भेटीत नेमके काय झाले हे पडद्याआड असले, तरी जिल्हाध्यक्ष गायकवाड यांचा पायगुण चांगला आहे, असे पवार म्हटल्याचे समजते. १९ जानेवारीला शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला पवार येणार असल्याचे निश्चित झाले. पान ४ वर

पाचपुतेंचे टेन्शन वाढणार ?

श्रीगोंद्याची जागा भाजपच्या वाट्याला आहे. गेल्या काही दिवसांत आमदार पाचपुते आजारी आहेत. त्यातच युतीत भाजपच्या वाट्याच्या काही जागा राष्ट्रवादीला सोडाव्या लागणार आहेत. नागवडे यांची पवार यांच्याशी वाढती जवळीक पाचपुते यांचे टेन्शन वाढविणारी आहे हे मात्र निश्चित.

Ajit pawar
MLA Disqualification Case Result: कुणाच्याही बाजूने निकाल न लागण्याची शक्यता! विधानसभा अध्यक्ष कसा भेदणार राजकीय पेच?

नागवडे काँग्रेस सोडणार?

१९ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर नागवडे काँग्रेस सोडणार असल्याचे वृत्त या भेटीत असणाऱ्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’ला दिले. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांची पोस्ट बरेच काही सांगून जाते.

नागवडे यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियात शेअर करीत ‘यशस्वी झालो’ ही त्यांची ओळ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ठोके वाढविणारी आहे. या पोस्टचा अर्थ काँग्रेसला खिंडार पडणार, असेच होत असल्याने नागवडे पवार यांच्यासोबत जाणार हेही उघडच आहे. (Latest Marathi News)

Ajit pawar
Phd Fellowship Paper Leak: ''परीक्षार्थींनी दिवे लावू नये म्हणून पेपर फोडण्याचं कारस्थान?'', विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.