Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : विखेंना मोठा धक्का! नगरकरांनी दिली निलेश लंकेंना दिल्लीत जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 NCP Sp Nilesh Lanke Win: भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून अहमदनगरसाठी सुजय विखेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी दिली.
Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result
Ahmednagar Constituency Lok Sabha Election ResultEsakal
Updated on

लोकसभेची आकडेवारी समोर आली आहे. विखेंची सत्ता असलेल्या अहमदनरगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके विजयी झाले आहेत. या मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत झाली. यामध्ये लंकेनी मोठा विजय मिळवला आहे.

निलेश लंके- ६,२४,७९७

सुजय विखे- ५,९५,८६८

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- २८,९२९

भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून अहमदनगरसाठी सुजय विखेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या निवडणुकीत डॉ. विखे यांच्या विरोधात आमदार संग्राम जगताप अशी लढत झाली होती. 1952 पासून ते 1996 पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 1998 मध्ये युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ला काबीज केला.

अहमदनगरमधील राजकीय समीकरणं बघता थोरात, जगताप समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळं यावेळी विखेंना तगडं आव्हान होतं. मात्र त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result
Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: ना जलील ना खैरे ऑन्ली भूमरे, वादांच्या भोवऱ्यात अडकूनही शिंदे गटाने मिळवला मोठा विजय

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

शेवगाव - मोनिका राजळे (भाजप), राहुरी - प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), पारनेर - नीलेश लंके (राष्ट्रवादी), अहमदनगर शहर - संग्राम जगताप (भाजप), श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (भाजप) कर्जत जामखेड - रोहित पवार (रा.काँ. शरद पवार)

विधानसभा निहाय विचार करता याठिकाणी शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 2 भाजपचे आमदार आहेत.

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result
Jalna Constituency Lok Sabha Election Result : दानवेंचा सिक्सर हुकला! जालन्यात काँग्रेसचे कैलास काळे ठरले जायंट किलर

अहमदनगरमध्ये सरासरी 63.03 टक्के मतदान

63.03 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली. दरम्यान, सर्वाधिक मतदान संगमनेर विधानसभा मतदारसंघात 65.77 टक्के तर त्या खालोखाल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 64.8 टक्के मतदान झाले. कमी मतदान अकोलेत 59.82 टक्के झाले. शिर्डीत 63.77, कोपरगाव 61.18, तर नेवाशात 63.29 टक्के मतदान झाले.

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result
Beed Constituency Lok Sabha Election Result: बीडमध्ये फिरली बजरंगाची गदा! पंकजा मुडेंचा चुरशीच्या लढतीत पराभव

मतदारसंघनिहाय झालेले मतदान

अकोले विधानसभा- एकूण 59.82 टक्के मतदान झाले, संगमनेर विधानसभा- एकुण 65.77 टक्के मतदान झाले, शिर्डी विधानसभा- एकुण 63.77 टक्के मतदान झाले, कोपरगाव विधानसभा- एकुण 61.18 टक्के मतदान झाले, श्रीरामपूर विधानसभा- एकुण 64.08 टक्के मतदान झाले, नेवासा विधानसभा- एकुण 63.29 टक्के मतदान झाले.

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result
Latur Constituency Lok Sabha Election Result : लातूरने पॅटर्न बदलला ! काँग्रेसचे काळगे आघाडीवर तर भाजपच्या सुधाकर श्रृंगारेंना दणका

२०१९ चे चित्र

डॉ. सुजय विखे (भाजप) विजयी मते : ७,०४,६६०

संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ४,२३,१८६

नामदेव वाकळे (बहुजन समाज पक्ष) मते : ६६९२

काळीराम पोपळगट (भानसे) मते : ३३९२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : २,८१,४७४

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result
Dharashiv Constituency Lok Sabha Election Result : धाराशिवमध्ये 'मशाल' पेटली; पुन्हा ओमराजे निंबाळकरांचा दणका, अजितदादांचा आयात उमेदवारांचा प्लॅन फसला?

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result
Baramati Constituency Lok Sabha Election Result: बारामतीकरांची लेकीलाच पसंती; नणंद-भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंची बाजी

हे मुद्दे प्रभावी ठरणार

जिल्ह्यातील साकळाईची पाणी योजना केव्हा होणार, नगर शहर, कर्जत येथील औद्योगिक कामगारांचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, शेवगाव- पाथर्डी साठीच्या पाणीयोजनेचा प्रश्न, शेतकरी वर्गाची भूमिका निर्णायक मुद्दा, काही पायाभूत सुविधांचे मुद्दे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com