Ahmednagar : एलईडीने उजळले ‘मनपा’चे भाग्य; वीजबिलात ७२ टक्के बचत; शहरात ३२ हजार दिवे

Ahmednagar Latest News | पारंपरिक पथदिवे बदलून स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे धोरण सरकारने जाहीर केले.
ahmednagar corporation put led on street light that reduce electricity bill
ahmednagar corporation put led on street light that reduce electricity billSakal
Updated on

अहमदनगर : शहर आणि उपनगरांत लावण्यात आलेल्या ३२ हजार ४५० स्मार्ट एलईडी (पथदिवे) स्ट्रिट लाईटमुळे महापालिकेच्या वीजबिलात ७२ टक्क्यांची बचत झाली आहे. त्यामुळे दरमहा ४५ लाख रुपयांचे वीजबिल वाचले आहे. लवकरच उर्वरित ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आज दिली.

पारंपरिक पथदिवे बदलून स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे धोरण सरकारने जाहीर केले. त्यानुसार महापालिकेने खासगी ठेकेदार संस्थेमार्फत शहर आणि उपनगरात ‘बचत मॉडेल’ अभियानांतर्गत ३२ हजार ४५० स्मार्ट एलईडी दिवे बसविले आहेत.

जुने २५ हजार २२६ पथदिवे काढून त्या जागेवर हे नवीन एलईडी दिवे बसविले आहेत. महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता ही योजना यशस्वीपणे राबविली. त्यातून महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीजबिलात सुमारे ७२ टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे.

पथदिवे बसवणे व त्याची पुढील सात वर्षांपर्यंत देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स लि. या ठेकेदार संस्थेची आहे. स्मार्ट एलईडीमुळे महापालिकेचे दरमहा सुमारे एक कोटीचे वीजबिल वाचले आहे.

ahmednagar corporation put led on street light that reduce electricity bill
Ahmednagar : अहमदनगर ‘झेडपी’त गुरुजींच्या बदल्यांचाही खेळ

पूर्वी संपूर्ण शहरात पथदिवे नव्हते, तरी देखील महापालिकेला ४० ते ४५ लाखांचे दरमहा वीजबिल येत होते. परंतु आता स्मार्ट एलईडीमुळे २० ते २२ लाख रुपयांचे बिल येत आहे. त्यातून बचतीची १६ टक्के रक्कम महापालिकेला मिळत आहे. एकूणच स्मार्ट एलईडी दिव्यांमुळे महापालिकेचे भाग्य उजळले असल्याचे सध्याचे चित्र आहे.

मनपाला १६ टक्के उत्पन्न

एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिकेने कोणतीही आर्थिक गुंतवणूक केलेली नाही. दिवे बसविणे व त्यांची सात वर्षांपर्यंत देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदार संस्थेची आहे. वीजबिलात जी बचत होईल, त्यातून ८४ टक्के हिस्सा ठेकेदार संस्थेला व १६ टक्के हिस्सा महापालिकेला मिळणार आहे.

ahmednagar corporation put led on street light that reduce electricity bill
Ahmednagar News : अनधिकृत मालमत्ता मनपाच्या रडारवर, आठ हजार घरांचे मोजमाप पूर्ण; बोगस नळजोडही उघड

पुरेसा प्रकाश

नॅशनल लाईट कोडनुसार पथदिवे लावून प्रकाशाची लक्स लेव्हल राखणे आवश्यक आहे. सध्या आवश्यक लक्स लेव्हलपेक्षा जास्त लेव्हल येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

गरज तेथे दिवा

ज्या भागात पोल नाहीत, तेथे अद्याप दिवे बसविण्यात आलेले नाहीत. लवकरच पाहणी करून आवश्‍यक तेथे एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. पथदिव्यांबाबत अडचणी व सूचनांसाठी १८००८३३४४१३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

ahmednagar corporation put led on street light that reduce electricity bill
Ahmednagar News : धोकादायक इमारतीत भरते शाळा; अस्तगाव येथील प्रकार, पालकांचा जीव टांगणीला
  • स्मार्ट एलईडी दिवे - ३२४५०

  • काढलेले जुने पथदिवे - २५२२६

  • वीजबिलात बचत - ७२ टक्के

  • महापालिकेचा हिस्सा - १६ टक्के

सरकारच्या धोरणानुसार शहरात स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे. ज्या ठिकाणी काही तांत्रिक कारणांमुळे अजूनही एलईडी दिवे नाहीत, तेथे लवकरच दिवे बसविण्यात येतील.

- यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()