Crime : पश्चाताप झाला अन् अडकला! मित्राला त्याच्या पत्नीच्या खूनात केली मदत; आता झाली सक्तमजुरी

Court
CourtSakal
Updated on

अहमदनगर : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस आश्रय देऊन पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याबद्दल बाबासाहेब भाऊ मराठे (वय ३ ६, रा. मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड) यास तीन वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ठोठावली. ॲड. अनिल ढगे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

Court
मानलं या चिमुरड्याच्या बुद्धीमत्तेला! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला घ्यावी लागली नोंद

मच्छिंद्र महादेव अकोलकर याने त्याची पत्नी अश्‍विनी हिस विन्टो कार (एम. एच. २० बी वाय ७७) मधून ता. ७ एप्रिल २०१६ रोजी मढी , मायंबा येथे देवाच्या दर्शनासाठी जायचे असे म्हणून घेऊन गेला. सदर गाडीमध्ये चाकूने तिला गंभीर जखमी करून ठार मारले. बाबासाहेब मराठे याने आरोपीस सदरचे कृत्य करण्यास मदत केली.

तसेच मयताचे प्रेत खर्डा गावचे अलीकडे जातेगाव घाटात नेवून प्रेतावर पेट्रोल टाकून प्रेत जाळून टाकण्यास मदत केली. कार जेजुरी (जि. पुणे) येथील तळयात घेऊन गेला आणि रक्ताचे डाग धुऊन पुरावा नाहीसा केला. त्यानंतर पुन्हा फरार आरोपी मच्छिंद्र अकोलकर यास वाघोली येथे सोडले.

मराठे याला घटनेचा पाश्‍चाताप झाल्यावर त्याने स्वतः पाथर्डी पोलिस ठाण्यात येऊन गुन्हयाची फिर्याद नोंदवली. पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. मृत अश्‍विनी हिचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर तसेच साक्षीदार व पंच यांच्या साक्षी अतिशय महत्वाच्या ठरल्या.

Court
Maharashtra Politics: प्रतिक्षेत असणाऱ्या बच्चू कडूंना मिळणार दिव्यांग मंत्रीपद? चर्चेला उधाण

तसेच पेट्रोल पंपावरील व टोल नाक्यावरील लावण्यात आलेले सी.सी.टी.व्ही . कॅमे - यामध्ये घटनेच्या वेळेस आरोपीचा वावर तसेच आरोपीने मयतास जाळण्यासाठी घेतलेले पेट्रोल याबाबत फुटेजमध्ये दिसून आले आहे. ॲड. मनिषा केळगंद्रे -शिंदे यांनी प्रारंभी काम पाहिले, त्यानंतर ॲड. अनिल ढगे यांनी उर्वरित कामकाज पूर्ण केले.

मराठे याला पुरावा नष्ट करण्यास मदत करणे आणि गुन्हेगाराला आश्रय दिल्याबद्दल तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश जोशी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.