Ahmednagar Crime News : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, भाजप नगरसेवकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघे ताब्यात

BJP Members Arrested : भाजप नगरसेवकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघे ताब्यात
Crime
Crimeesakal
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (रा. पद्मानगर, पाईपलाईन रस्ता) यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी जीवघेणा हल्ला केला. पाईपलाईन रस्त्यावरील एकवीरा चौकात शनिवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यात जखमी झालेले चत्तर यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी बाळासाहेब भानुदास सोमवंशी (वय ४२, रा. गावडे मळा, पाईपलाईन रस्ता) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाख, सूरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुऱ्हे, राजू फुलारी (सर्व रा. अहमदनगर) यांच्यासह इतर सात ते आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस तसेच उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चत्तर व नगरसेवक शिंदे यांच्यात काही कारणावरून वाद होते. शनिवारी रात्री चत्तर यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलांमध्ये भांडण सुरू होते. चत्तर यांनी हे भांडण सोडविले. त्यानंतर ‘तुमच्याशी काही बोलायचे आहे, थोडावेळ थांबा,’ असे म्हणत राजू फुलारी याने चत्तर यांना थांबविले. यावेळी दोन दुचाकीवर काही मुले त्याठिकाणी आले. त्यानंंतर काळ्या रंगाची दोन चारचाकी वाहने तेथे आली. एका वाहनात चालकाच्या शेजारच्या सिटवर नगरसेवक शिंदे बसला होता. सर्वांनी वाहनाच्या खाली उतरून चत्तर यांच्यावर

Crime
Maharashtra Poltical Crisis: राज्यातील सत्तासंघर्षावर महत्वाच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपच्या तुकड्यांनी हल्ला केला. ‘याला संपवून टाका,’ असे स्वप्नील शिंदे सांगत होता. हल्ला करणाऱ्या एकाच्या हातात गावठी पिस्तुल होते. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले चत्तर रस्त्यावर बेशुद्ध झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नी शोधून द्या, अन्यथा गाव बंद!

दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या अंंकुश चत्तर यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहचले. हल्लेखोरांंच्या विरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

शहरात काही दिवसांपूर्वीच ओंकार भागानगरे या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्याचबरोबर पाईपलाईन रस्त्यावर देखील यापूर्वी दोन गटांत हाणामारीच्या घटना समोर आलेल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच अंकुश चत्तर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.