बूट, हातमोजे अन् तुटलेले सिमकार्ड; एका कारमुळे बेपत्ता असलेल्या वकील दाम्पत्याचे पुढे काय झाले? प्रकरण कसे उघडकीस आले?

राहुरी न्यायालयात वकिली करणाऱ्या पती-पत्नीचे कट रचून अपहरण करून, पाच लाखांच्या खंडणीसाठी त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. ॲड .राजाराम जयवंत आढाव (वय ५२), ॲड. मनीषा राजाराम आढाव (वय ४२, दोघेही रा. मानोरी) अशी मृतांची नावे आहेत.
Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime Newsesakal
Updated on

राहुरी : राहुरी न्यायालयात वकिली करणाऱ्या पती-पत्नीचे कट रचून अपहरण करून, पाच लाखांच्या खंडणीसाठी त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. ॲड .राजाराम जयवंत आढाव (वय ५२), ॲड. मनीषा राजाराम आढाव (वय ४२, दोघेही रा. मानोरी) अशी मृतांची नावे आहेत.

चार जणांनी अटक

याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह चार जणांना पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. किरण उर्फ दत्तात्रेय नानाभाऊ दुशिंग (वय ३२, रा.उंबरे), भैय्या उर्फ सागर साहेबराव खांदे (वय २३, रा.येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक (वय २५, रा. मानोरी), हर्षल दत्तात्रेय ढोकणे (वय २०, रा. उंबरे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बबन सुनील मोरे (रा. उंबरे) असे फरार आरोपीचे नाव आहे.

आरोपी दुशिंग विरुद्ध संगमनेर तालुका, वावी व वडनेर भैरव (नाशिक ग्रामीण), यवत (पुणे ग्रामीण) व राहुरी पोलीस ठाण्यात खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी असे गंभीर १२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी खांदे विरुद्ध ओतूर (पुणे ग्रामीण), सोनई पोलीस ठाण्यात दरोडा, आर्म ॲक्ट अन्वये दोन गुन्हे दाखल आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यांना राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकांनी सहाय्य केले.

Ahmednagar Crime News
Mahavikas Aghadi: प्रकाश आंबेडकरांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा होणार; काँग्रेस प्रभारींचा हिरवा कंदील

अशी घडली घटना

राहुरी न्यायालयासमोर शुक्रवारी पहाटे दोन वाजता पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाला रस्त्यावर ॲड.आढाव यांची कार (एमएच १७ एई २३९०) बेवारस आढळली. त्यावेळी पोलिसांना पाहून एक कार भरधाव वेगाने पळून गेली. चावी असल्याने कार राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

कारमध्ये एक रबरी हातमोजा, दोरी, एक बूट, तुटलेले सीमकार्ड अशा वस्तू आढळल्या. अपहरणाचा संशय बळावला. तपासाची चक्रे फिरली. ॲड. आढाव यांच्या भगिनी लता राजेश शिंदे (वय ३८, रा. संगमनेर) यांनी काल (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता आढाव दांपत्य गुरुवारी (ता. २५) दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

असा झाला तपास

स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके रवाना झाली. मानोरी ते राहुरी रस्त्यावरील, राहुरी न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, वकील दांपत्याकडील आरोपींचे वकील पत्र तपासण्यात आले. मानोरी व न्यायालय परिसरात दिवसा व रात्रीच्या वेळी एक संशयित कार गेल्याचे फुटेज मध्ये आढळले. ती सराईत गुन्हेगार दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली. त्याचे वॉरंटचे प्रकरण आढाव दांपत्याकडे होते. दुशिंगला ताब्यात घेतले. त्याने हत्याकांडाची कबुली दिली. साथीदारांची नावे सांगितली. मृतदेहाची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणाची माहिती दिली.

उंबरे येथेशुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता दोन्ही मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर उपस्थित होते.

Ahmednagar Crime News
Fadnavis on Maratha Morcha : ''गंभीर स्वरुपातील गुन्हे मागे घेता येणार नाहीत'', फडणवीसांचं स्पष्टीकरण

हत्याकांड असे घडले..

आरोपींनी कट करून गुरुवारी (ता. २५) दुपारी वकील दांपत्याला राहुरी न्यायालयातून बोलावून घेतले. आरोपी दुशिंग याने स्वतःच्या गाडीत मानोरी येथे वकील दांपत्याला त्यांच्या घरी नेले. घरात दोघांचे हातपाय बांधून पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने पाच-सहा तास छळ केला. नंतर वकिलाच्या कारमध्ये दांपत्याला मानोरी गावाबाहेर नेले. त्याच रात्री दोघांच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून श्वास गुदमरून त्यांचा खून केला. त्यांचे मृतदेह दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत टाकले. वकिलाची कार (शुक्रवारी) पहाटे राहुरी न्यायालयासमोर लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.