Ahmednagar: अहमदनगरमध्ये कट्टा खरेदी-विक्री करणाऱ्यांचे दणाणले धाबे; कट्टा बाळगणाऱ्यांना अटक, तरुणांची संख्या सर्वाधिक

महिनाभरात नेवासे तालुक्यातील नऊ जणांकडून चार गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहेत. कट्‍ट्यांवर आता पोलिसांनी कटाक्ष नजर टाकल्याने कट्टा खरेदी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Ahmednagar Crime
Ahmednagar Crime
Updated on

Ahmednagar Police Focus on Guns Handlers: लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कायदा व सुव्यवस्था सुरळीत असावी याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार अवैध हत्यारे व अग्निशस्रे विक्री, वापर व धाक दाखविणारे सध्या रडारवर आहेत. महिनाभरात नेवासे तालुक्यातील नऊ जणांकडून चार गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहेत. कट्‍ट्यांवर आता पोलिसांनी कटाक्ष नजर टाकल्याने कट्टा खरेदी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नेवासे तालुक्यात वाळू, मुरूम, चंदनचोरी, रस्तालूट, स्वस्तात सोने, मटका, प्लॉटिंग, बेकायदा सावकारी, दुचाकीसह शेतातील वीजपंप चोरणारी टोळीच कार्यरत आहे. असे धंदे करणाऱ्यांच्या बहुतेक युवकांच्या कमरेला गावठी पिस्तूल आहे. युवा पिढीतील काहींना कट्ट्याने मोहिनी घातली आहे. सध्या अटक केलेल्यांमध्ये तरुणांची संख्याच जास्त दिसून येत आहे.

तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश व विश्वास नांगरे पाटील यांच्या कठोर कारवाईत विक्रमी कट्टे हस्तगत केलेले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हा अन्वेषण व तीन पोलिस ठाण्यातील अधिकारी सध्या अ‍ॅक्शन मोडवर असल्याने कारवाईचा धडाका सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी आदर्श गाव मोरया चिंचोरे, घोडेगाव, लोहारवाडी व जेऊर हैबती येथील नऊ आरोपीस अटक करून चार गावठी पिस्तूल, लोखंडी हत्यार व तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. (Latest Marathi News)

मोठ्या गावांसह लहान गावे व वाड्यावस्त्यांवर पिस्तुलाचे आकर्षण वाढत असल्याने दुसऱ्या राज्यातील विक्रेत्यांची वर्दळ वाढली आहे.

Ahmednagar Crime
Akash Deep : 13 व्या वर्षी वडील अन् भावाला गमावलं; स्ट्रेच फ्रॅक्चरमधून सावरत कसोटी पदार्पण करणाऱ्या आकाश दीपची झुंजार स्टोरी

अवैध धंदे, व्यावसायिक स्पर्धा व वर्चस्व ठेवण्याकरिता वापर वाढत आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, खगेंद्र टेंभेकर व सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी मोहीम राबविण्यात सातत्य ठेवले, तरच भाईगिरीला आळा बसून गुन्हेगारीचा कलंक शिक्षण घेणाऱ्या युवकांच्या माथी लागणार नाही, याची पोलीस प्रशासनाने काळजी घेण्याची गरज आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime
Devendra Fadnavis : राजकीय मतभेद दूर करणे सोपे पण...; ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल फडणवीसांची गुगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.