अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक-दोनच्या अंतर्गत असणाऱ्या १७ गावांतील तलाव व बंधारे भरून मिळवेत; अन्यथा शेतकरी जलसंपदा कार्यालयासमोर बेमुदत बैठा सत्याग्रह करतील, असा इशारा जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी दिला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक दोनमधील १७ गावांतील शेतकऱ्यांनी अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बा. क. शेटे यांना आज अहमदनगर येथे निवेदन दिले. या वेळी रामकिसन मडके, जालिंदर कापसे, रामजी मडके, रामकिसन सांगळे आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे, की ताजनापूर लिफ्ट योजनेला अखेर मूर्त स्वरूप आले आहे. १९६५ सालापासून शेवगाव तालुक्याचा तीन पिढ्यांचा लढा आता पूर्णत्वाला आलेला आहे.
अॅड. शिवाजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली १९९९ पासून हा संघर्ष सुरू आहे. शेवगाव तालुक्यातील १७ दुष्काळी गावांचा म्हणजे प्रभूवाडगाव, गदेवाडी, नजीक बाभूळगाव, चापडगाव, राक्षी, ठाकूर निमगाव माळेगाव-ने, वरखेड, सोनेसांगवी, हसनापूर, कोळगाव, मंगरूळ खुर्द, मंगरूळ बुद्रुक, आंतरवाली या १७ गावांचा समावेश झालेला आहे. योजनेचे ठिबक सिंचनच्या कामाव्यतिरिक्त बरीचशी कामे पूर्ण होत आलेले आहे. ठिबक सिंचनचे टेंडर निघाले नाही. ठिबक सिंचनचे काम अपुरे आहे. या कामाचे टेंडर निघण्यास व या कामासाठी बराचसा कालखंड जाणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
अधिक दिरंगाई न करता शेवगाव तालुक्याच्या नावाने जायकवाडी धरणात असलेले ताजनापूर लिफ्टच्या दुसऱ्या टप्याचे २.२ टीएमसी पाणी या १७ गावांतील सर्व तलाव व बंधाऱ्यामध्ये तातडीने सोडण्यात यावे. याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास जलसंपदा खात्यापुढे शेवगाव तालुक्यातील शेतकरी बेमुदत बैठा सत्याग्रह करतील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.