Ahmednagar : जिल्ह्याचा भार ३७ डॉक्टरांवर ; जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; ५०० बेडची मागणी दुर्लक्षित

वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येमुळे ४८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज तब्बल एक हजार ते बाराशे रुग्ण तपासणीसाठी येतात.
ahmednagar
ahmednagar sakal
Updated on

अरुण नवथर

अहमदनगर - जिल्हा रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने रूग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दाखल रुग्णांची संख्या ४२५ पेक्षा अधिक आहे. याशिवाय ओपीडीच्या रुग्णांची संख्या दररोज हजार ते बाराशेच्या पुढे असते. मात्र त्यांच्यावर उपचारासाठी अवघे ३७ डॉक्टर उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे.

वेळेवर औषधे न मिळाल्याने नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध असला, तरी पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना दररोज करावा लागत आहे.

रुग्णालयासाठी २८२ बेडची मंजुरी आहे. मात्र, वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येमुळे ४८० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज तब्बल एक हजार ते बाराशे रुग्ण तपासणीसाठी येतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागात उपचारासाठी तब्बल ४२५ रूग्ण दाखल आहेत. परंतु या सर्व रुग्णांच्या तपासणीसाठी केवळ ३७ डॉक्टर असल्याने रूग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते.

ahmednagar
Chh. Sambhaji Nagar : लिचेडच्या घाण पाण्यामुळे पिके करपली

नवीन अतिदक्षता विभाग

जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागाला आग लागून १४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या रुग्णालय प्रशासनाने नवीन अतिदक्षता विभागाची उभारणी करत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.

ahmednagar
G-20 Conference : जी-20 शिखर परिषदेचे फलित

दररोज १२०० रुग्णांची तपासणी

रुग्णालयात दररोज सुमारे बाराशे रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र, त्याप्रमाणात डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना तासंतास उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते. अपघात, अतिदक्षता विभाग, तसेच प्रसुती, लहान मुलांचा वॉर्ड, जनरल वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल आहेत.

रुग्णालयात उपचारासाठी केवळ आपल्याच जिल्ह्यातील रूग्ण येतात. तसेच याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय नाही. त्यामुळे नांदेडसारखी घटना घडण्याचे कारण नाही. आपल्याकडे तीन महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध आहे.

डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक

ahmednagar
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

कोरोनासारख्या महामारीनंतर आरोग्य विभागासाठी जास्तीत जास्त उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, सरकारला अजूनही हे काम जमलेले नाही. त्यामुळेच नांदेडसारख्या घटना घडतात. आता जनतेने सरकारी रुग्णालयांवर विश्वास ठेवायचा की नाही, अशी परिस्थिती आहे.

सत्यजित तांबे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.