Dengue : अहमदनगर जिल्ह्याला डेंगीचा डंख; जिल्ह्यात २२५ बाधित, शहरात ५८४ संशयित

दोघांचा मृत्यू : सहा महिन्यांपासून ताप उतरेना
ahmednagar district dengue 225 infected  584 suspected health marathi news
ahmednagar district dengue 225 infected 584 suspected health marathi newsSakal
Updated on

अहमदनगर : गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा डेंगीच्या तापाने फणफणला आहे. तब्बल सव्वादोनशे रुग्ण बाधित आढळले आहेत. आतापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला. इडिस इजिप्ती डासाचा आरोग्यावर हल्ला हा खिशावर डल्ला ठरत आहे. कारण उपचारासाठी किमान ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे.

जिल्ह्यात सध्या गावोगाव डेंगीचे रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या जिल्ह्यातही काही रुग्ण उपचार घेताना दिसतात. कोणत्याही तापाला डेंगीचा ताप समजले जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. हिवतापासोबतच चिकुनगुण्याचेही रुग्ण आहेत. ऑगस्ट महिन्यात २३ रुग्ण जिल्हा हिवताप कार्यालयास आढळले होते.

डेंगीमुळे नगर तालुक्यातील मेहेकरी व नेवाशातील सोनई या गावांतील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. जिल्हा मृत्यू संशोधन समिती संबंधितांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांतून झाला, याची तपासणी करीत आहे.

उपाय काय

आरोग्य केंद्रस्तरावर गप्पी मासे उपलब्ध आहेत. पाणीटंचाई असल्याने लोकांचा ते साठवणुकीकडे कल वाढत आहे. या पाण्यावर डास अंडी घालतात. त्यातूनच पैदास वाढते. गप्पी मासे सोडल्यास ते लारवा खातात. जून महिन्यापासून डेंगीचा प्रादूर्भाव वाढला आहे. घराशेजारील पाण्याच्या डबक्यात, तसेच स्वच्छतागृहाच्या पाईपमध्येही डास अंडी घालतात. पाईपला जाळी बसवल्यास टाकीतून डास वर येणार नाहीत.

अशी घ्या काळजी

  • खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात

  • घराजवळ पाणी साठवू नये

  • मच्छरदाणीचा वापर करा

  • गाड्या धुवून रस्त्यावर पाणी सोडू नका

  • हौदात बदलते पाणी ठेवा

  • संध्याकाळी डास घरात येऊ नये म्हणून काळजी घ्या

धूळफेक की धूरफवारणी

आरोग्य विभागाकडे पुरेशी यंत्रणाच नाही. दीड हजार गावांसाठी अवघे पाचशे आरोग्यसेवक आहेत. त्यातही त्यांना इतर कामे करावी लागतात. सुट्ट्या किंवा रजांचा विचार केल्यास त्यांना कामास फारसा वेळच मिळत नाही. ज्या गावांत बाधित रुग्ण आढळतील तेथे ग्रामपंचायतीमार्फत प्रबोधन केले जाते. डेंगीच्या पार्श्वभूमीवर ८७ गावांत धूळफवारणी केली आहे. मात्र, काही ठिकाणी ही केवळ धूळफेक असल्याचा ग्रामीण भागातील लोकांचा आरोप आहे.

५ लाख रक्त नमुन्यांची तपासणी

आरोग्यसेविका गावागावांत जाऊन रक्ताचे नमुने घेत आहेत. डेंगीचे जानेवारीपासून १ हजार २०९, तर हिवतापाचे ५ लाख ६४ हजार ६५३ नमुने तपासले आहेत. हे नमुने सिव्हिलमधील प्रयोगशाळेत पाठवले जातात. दोन दिवसांत त्याबाबतचा रिपोर्ट येतो. खासगी रुग्णातील डेंगीचा रिपोर्ट सरकारी यंत्रणा सत्य मानत नाही. मृत्यूनंतरही कोणत्या कारणाने मृत्यू झाला किंवा त्या रुग्णावर कोणते उपचार केले याची तपासणी जिल्हा मृत्यू संशोधन समिती तपासणी करते, असे प्रभारी अवैद्यकीय संजय सावंत यांनी सांगितले.

नगरमध्ये ४३ बाधित

नगर शहरात डेगीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज शहरात तब्बल ५८४ डेंगीसदृश्य रुग्ण आहेत. ४३ जणांना डेगी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. औषध फवारणी धूर फवारणी सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली.

आरोग्य यंत्रणा

  • प्राथमिक आरोग्य केंद्र - ९६

  • उपकेंद्र - ५५५

  • आरोग्यसेविका-सेवक - ३२५

  • आरोग्यसेविका (मलेरिया) - २२८

दृष्टिक्षेपात..

  • हिवताप नमुने तपासणी - ५६४६५३

  • दूषित रुग्ण- ०२

  • इतर जिल्हा रुग्ण -०६

  • डेंगी रुग्ण रक्त नमुने - १२०९

  • बाधित रुग्ण - २२८

  • इतर जिल्हा -०७

  • चिकुनगुण्या नमुने- २६

  • दूषित रुग्ण -०१

लहान मुलांना डेंगी होऊ नये यासाठी डास चावू नये, ही प्राथमिक काळजी घ्यावी. घरातील भांडी, नारळाच्या कवट्या, गाडगे, टायर यात पाणी साठलेले असल्यास त्वरित स्वच्छ करावे. मुलांना मच्छरदाणीचा वापर करावा. डेंगी झाल्यास घाबरून जाऊ नये. या आजारात प्लेटलेट वेगाने कमी होत असल्याने वेळेत उपचार आवश्यक असतात.

- डॉ. दिलीप बागल, बालरोगतज्ज्ञ.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये घर अथवा घराच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्दी ताप खोकला जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घ्यावेत.

- डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, मन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.