Oxygen Plant : सरकारी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्ट बनला शोभेचा ‘स्तंभ’; कोट्यवधींचा खर्च पाण्यात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला होता. याच काळात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती.
Ahmednagar District Government Hospital Oxygen Plant
Ahmednagar District Government Hospital Oxygen Plantsakal
Updated on

अहमदनगर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला होता. याच काळात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता गृहीत धरून सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारून ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आले होता. यावर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत; मात्र हा ऑक्सिजन प्लॅन्ट आता फक्त शोभेचा ‘स्तंभ’च बनला आहे.

जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व २३ ग्रामीण रुग्णालयांत आहे, तसेच जिल्हा परिषदेचे ५६५ उपकेंद्र व १०० आरोग्य केंद्र आहेत. या माध्यमातून जिल्‍ह्यातील जनतेला आरोग्य सुविधा दिल्या जात आहे. कोरोना काळात या सर्व रुग्णालयांतून रुग्णांना चांगली सेवा देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. याच काळात सरकारच्या वतीने जिल्ह्यात १५ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारले आहेत.

हे सर्व प्लॅन्ट ६०० एलपीमचे आहेत. या एका प्लॅन्टसाठी सुमारे ८० ते एक कोटी रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. यातील जिल्हा रुग्णालयासह समशेरपूर व कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅन्ट पंतप्रधान सहायत्ता निधीतून उभारण्यात आले आहेत. उर्वरित राज्य सरकारच्या निधीतून प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. या प्लॅन्टच्या माध्यमातून कोरोना काळात ऑक्सिजन तयार करून त्याचा वापर करण्यात आला आहे.

कोरोना आता हद्दपार झालेला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ पैकी १५ ऑक्सिजन प्लॅन्ट सध्या बंद आहेत. या प्लॅन्टमधून ऑक्सिजन तयार करण्यापेक्षा विकत घेणे परवडत असल्याने प्लॅन्टमधून होणारी ऑक्सिजन निर्मितीची बंद ठेवण्यात आली आहे, या प्लॅन्टच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही.

त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना ही कामे द्यावी लागतात. कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात काहींना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु कोरोनानंतर आता त्या कर्मचाऱ्यांना मूळ जागी वर्ग करण्यात आले आहे.

टॅंकमध्ये साठवणूक

कोरोना काळात ऑक्सिजन साठवणुकीसाटी २० केएलचा टॅंकर उभारण्यात आलेला आहे. या टॅंकमध्ये ऑक्सिजनची साठवणूक केली जाते. त्यासाठी मासिक तीन ते पाच लाखांचा खर्च येतो. ग्रामीण रुग्णालयांना तीन ते पाच हजारांचा ऑक्सिजनवर खर्च होतो.

जिल्ह्यात १५ ऑक्सिजन प्लॅन्ट आहेत. या सर्वांचे मॉनिरेटिंग केले जाते. ऑक्सिजनची मागणी कमी असल्याने हे सर्व प्लॅन्ट बंद आहेत. मात्र, ऐनवेळी गरज पडल्यास तातडीने ते सुरू करण्यात येतील.

- संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

प्लॅन्टसाठी येणारा खर्च -

  • दैनंदिन विजेवर - १० ते १५ हजार

  • दैनंदिन जनरेटर - २५ ते ३० हजार

  • मासिक विजेवर खर्च - ४५००००

  • मासिक खर्च जनरेटरचा - नऊ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.