Ahmednagar : कुणी रस्ता देता का रस्ता? राजळेवाडी, ब्राह्मणीतील विद्यार्थ्यांचा सवाल

राजळेवाडी ते ब्राह्मणीदरम्यान एकूण सहा किलोमीटरपैकी ब्राह्मणीपासून पुढील तीन किलोमीटर रस्त्याचे काम झालेले आहे,
ahmednagar
ahmednagarsakal
Updated on

राहुरी/नेवासे - राजळेवाडी (ता. नेवासे) ते ब्राह्मणी (ता. राहुरी) रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे, पावसाचे पाणी, चिखलमय रस्त्यावरून सायकलवर शाळेत जायचे कसे, असा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना पडला आहे. कुणी रस्ता देता का रस्ता, असा टाहो या परिसरातील विद्यार्थी नेहमीच फोडत आहेत.

राजळेवाडी ते ब्राह्मणीदरम्यान एकूण सहा किलोमीटरपैकी ब्राह्मणीपासून पुढील तीन किलोमीटर रस्त्याचे काम झालेले आहे, परंतु त्यापुढील राजळेवाडीपर्यंतचा तीन किलोमीटर रस्ता अक्षरशः उद्‌ध्वस्त झाला आहे. नेवासे तालुक्यातील खेडले परमानंद व राजळेवाडी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने ब्राह्मणी येथे माध्यमिक शिक्षणासाठी सायकलवर प्रवास करतात.

या रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. राजळेवाडी येथील बहुतांश ग्रामस्थांचे दळणवळण ब्राह्मणी येथे आहे. पादचारी, सायकल व दुचाकीवर जाणारे शेतकरी, दूधउत्पादक, शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर अक्षरशः कसरत करावी लागत आहे. नेवासे व राहुरी तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

ahmednagar
Ahmednagar : सराफ बाजार रामभरोसे ; सराफी दुकान फोडून चोरट्यांकडून २५ लाख रुपयांचे सोने लंपास

राजळेवाडीच्या (ता. नेवासे) बाजूने तीन किलोमीटर ब्राह्मणी रस्ता अत्यंत खराब आहे. सायकलवरील शालेय विद्यार्थिनींचे सर्वाधिक हाल होत आहेत. पाऊस पडल्यावर रस्त्यावरून प्रवास करणे शक्य होत नसल्याने मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे.

बापू नवाळे, सामाजिक कार्यकर्ते, ब्राह्मणी.

ahmednagar
Ahmednagar Collector : ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कापला केक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.