Ahmednagar : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ऊसतोड मजुरांचे आधारस्तंभ आणि माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

गेल्या १५ दिवसांपूर्वी श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
babarao dhakne
babarao dhakne sakal
Updated on

पाथर्डी - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ऊसतोड मजुरांचे आधारस्तंभ आणि माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री बबनराव ढाकणे (वय ८७) यांचे आज  निधन झाले.

गेल्या १५ दिवसांपूर्वी  श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची  प्राणज्योत मालवली. ढाकणे यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव येथील हिंद वसतिगृहात आणल्यानंतर अनेकांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आमदार मोनिका राजळे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली होती.

उद्या (ता. २८) त्यांच्यावर पागोरी पिंपळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ढाकणे यांचा जन्म तालुक्यातील अकोले येथील शेतकरी कुटुंबात १० नोव्हेंबर १९३७ साली झाला. त्यांनी तीन वेळा विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, लोकसभा सदस्य, तसेच राज्यात सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास मंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे मंत्री म्हणूनही काम केले. ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभा उपाध्यक्ष तसेच केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री  अशी महत्त्वाची पदेही भूषविली होती.

सर्वसामान्यांसाठी जनकैवारी म्हणून परिचित असणारे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करीत त्यांनी राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी कामगारांचे प्रश्न हिरिरीने मांडले. बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करून थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.