Ahmednagar News : बोगस मालमत्ताधारक रडारवर; जीआयएस सर्व्हेला सुरूवात; २५०० मालमत्तांची मोजदाद पूर्ण

शहराचा विस्तारात दररोज नव्या इमारती उभ्या राहत आहेत. परंतु महापालिकेच्या दप्तरी केवळ एक लाख ३१ हजार मालमत्तांचीच नोंद आहे.
Ahmednagar GIS Scheme survey counting 2500 properties complete
Ahmednagar GIS Scheme survey counting 2500 properties completeSakal
Updated on

Ahmednagar News : शहरातील एक लाख ३१ हजार इमारती, घरे, भूखंडांचे जीआयएस मॅपिंगद्वारे मोजमाप सुरू झाले आहे. दोन महिन्यात अडीच हजार मालमत्तांची मोजदाद पूर्ण झाली आहे. त्यात अनेक बोगस मालमत्ताधारक महापालिकेच्या रडारवर आले आहेत.

खासगी ठेकेदार संस्था ‘मॅम माय इंडिया’मार्फत हे सर्व्हेक्षण सुरू आहे. महापालिका १५ कोटी रूपये खर्च करणार आहे. शहराचा विस्तारात दररोज नव्या इमारती उभ्या राहत आहेत. परंतु महापालिकेच्या दप्तरी केवळ एक लाख ३१ हजार मालमत्तांचीच नोंद आहे.

या मालत्तांकडून जून्‍याच पद्धतीने कर आकारणी केली जाते. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रूपयांचा कर बुडत आहे. कर आकारणीचे फेर मुल्यांकन करणे, तसेच बोगस मालमत्तांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शहरातील सर्व मालमत्तांचे मोजमाप करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

खासगी ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले असून, मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. इमारती, घरे, मोकळ्या जागा, ओढे- नाले, तसेच इतर मालमत्तांचे जीआयएस मॅपिंगद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

सर्व्हेक्षणानंतर महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. घरगुती, व्यावसायिक मालमत्ता, बोगस मालमत्ता, तसेच अधिकृत नळजोड असलेल्या मालमत्तांची स्वतंत्र नोंद सर्व्हेक्षणाद्वारे करण्यात येणार आहे.

मालमत्तांचे संगणकीकरण

शहरातील सर्व मालमत्तांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंगद्वारे घेण्यात आलेले मालमत्तांचे मोजमाप, बांधकामाचे नकाशे, बांधकामाचे छायाचित्र अशी सर्व माहिती नव्याने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये संकलित केली जाणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित करून सुधारीत कर प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.

वसुली लिपिक हवेत बरोबर

खासगी ठेकेदार संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाचे काम करत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना मालमत्ताधारक दाद देत नाहीत. त्यासाठी सर्व्हे सुरू असताना महापालिकेचे वसुली लिपिक बरोबर असणे गरजेचे आहेत. काही ठिकाणी भाडेकरू असतानाही सर्व्हेमध्ये नोंद घेतली जात नाही, अशा तक्रारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.