अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

कर्मचाऱ्याने तिच्यावर लैंगिक छळ केला
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारesakal
Updated on

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आत्माराम बापूराव लगड (वय ५८, रा . आठवड ता. जि. अहमदनगर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ३ एम. ए. बरालीया यांनी शिक्षा सुनावली. या शिक्षेत लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम १० प्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजाराचा दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद तसेच कलम १२ प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी ५०० रूपये दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद तसेच नुकसान भरपाई दाखल पीडितेस दीड हजार दंडाच्या रकमेतून देण्याचा आदेश केला आहे.

या घटनेची थोडक्यात हकीगत की, पीडिता ही अहमदनगर येथील एका विद्यालयामध्ये सातवीत शिक्षण घेत होती. ती दोन व चार डिसेंबरला २०१९ला सकाळी दहाच्या सुमारास शाळेत गेली असता तेथील कर्मचाऱ्याने तिच्यावर लैंगिक छळ केला म्हणून पीडितेच्या आईने आरोपी विरुध्द तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली होती.

या खटल्यामध्ये अतिरिक्‍त सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी यांनी एकूण ७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये पीडीता, तिची आई व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने सरकारी पक्षातर्फे नोंदविलेला भक्कम पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.